महाराष्ट्रात हवामानाचा लहरीपणा कायम! कुठे पावसाच्या सरी, तर कुठे उन्हाचा चटका; जाणून घ्या हवामानाचा रिपोर्ट

काही दिवसांपूर्वी राज्यात पावसाच्या तुरळक सरी बरसल्यामुळे उन्हाचा तडाखा कमी झाला होता. मात्र काही ठिकाणी पावसाच्या गैरहजेरीमुळे उष्णतेचे प्रमाण वाढत आहे.

महाराष्ट्रात हवामानाचा लहरीपणा कायम! कुठे पावसाच्या सरी, तर कुठे उन्हाचा चटका; जाणून घ्या हवामानाचा रिपोर्ट

काही दिवसांपूर्वी राज्यात पावसाच्या तुरळक सरी बरसल्यामुळे उन्हाचा तडाखा कमी झाला होता. मात्र काही ठिकाणी पावसाच्या गैरहजेरीमुळे उष्णतेचे प्रमाण वाढत आहे. हवामान विभागाच्या आजच्या अंदाजानुसार, पावसादरम्यान वाऱ्यांचा वेग ताशी 40 ते 70 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. काही ठिकाणी मेघगर्जनेसह वीज पडण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये 23 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत पावसाच्या हालचाली अधिक सक्रिय राहण्याची शक्यता आहे.

कोणत्या राज्यांत पावसाची शक्यता?
तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशसह पुडुचेरी, अंदमान-निकोबार बेटे आणि लक्षद्वीप परिसरात पावसाचा प्रभाव जाणवू शकतो. काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात विकसित होत असलेल्या हवामान प्रणालीमुळे ही स्थिती आणखी तीव्र होऊ शकते.

महाराष्ट्रात आज काय स्थिती?

सध्या महाराष्ट्रात ऑक्टोबर महिना सुरू असल्याने मान्सूनचा काळ बऱ्यापैकी संपला आहे. मात्र राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहे.

1. कोकणात उष्ण आणि दमट वातावरण:
गेल्या 2 दिवसांत कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये रिमझिम पावसाने हजेरी लावली होती. मात्र आज कोकणात प्रामुख्याने उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. मुंबईसह अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने 23 ऑक्टोबर रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरीत संध्याकाळी मेघगर्जनेसह तुरळक सरींची शक्यता आहे.

हेही वाचा – WL, RAC ला कंटाळलात? या प्रवाशांना मिळणार एक वर्ष आधी तिकीट बुकिंगची संधी; IRCTC चा नियम जाणून घ्या

2. पश्चिम महाराष्ट्रात कुठे पाऊस, कुठे कोरडे?
कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या घाटमाथा परिसरात आज मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. तर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि इतर घाटमाथा भागात हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे, मात्र तापमान वाढीमुळे उकाडा जाणवणार आहे.

3. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता कमी:
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यात 23 ऑक्टोबर रोजी पावसाचा विशेष अंदाज नाही. नाशिकच्या घाटमाथा परिसरातही हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

4. विदर्भात विशेष इशारा नाही:
विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी कोणताही विशेष हवामान इशारा देण्यात आलेला नाही. या भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. अमरावती आणि अकोला जिल्ह्यात तापमान 22 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.एकूणच, महाराष्ट्रात सध्या कुठेही मुसळधार पाऊस सुरू नाही, मात्र नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय?
महाराष्ट्रात गेले दोन दिवस कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये रिमझिम पावसाने हजेरी लावली. मात्र आज कोकणात उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता असून मुंबईसह अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान | Maharashtra Teacher and Graduate Constituency Election

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number