मुंबईतील गोरेगाव पूर्व भागातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. गोरेगाव पूर्वेतील शिवशाही परिसरात एका 10 वर्षीय शेजारील मुलीने इमारतीच्या डक्टमध्ये 18 महिन्यांच्या बाळाला ढकलल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. ही घटना मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील शिवशाही परिसरात 14 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 9.15 वाजता घडली असल्याची माहिती समोर आली आहे. 18 महिन्यांच्या चिमुरडीचा इमारतीच्या डक्टमध्ये पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत बालक आणि आरोपी मुलगी एकाच इमारतीत शेजारी राहत होते. घटनेच्या दिवशी दहा वर्षाची मुलगी शेजारच्या घरी असलेल्या लहान मुलीसोबत खेळायला आली. यावेळी शेजारी राहणाऱ्या 10 वर्षीय मुलीने खेळताना चिमुरडीला उचलून इमारतीच्या डक्टमध्ये ढकलल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याची माहिती आहे. या घटनेत उंचावरून पडल्याने चिमुरडीचा मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर सुरुवातीला सर्वांनाच हा एक अपघात असल्याचे वाटले होते.
परंतु, जेव्हा सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, तेव्हा सत्य समोर आले आणि सर्वांच्या अंगावर काटा आला. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद (ADR) केली असून, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी चिमुरडीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास दिंडोशी पोलीस करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र शोककळा पसरली असून एकच खळबळ उडाली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.