मामेबहिणीशी बोलण्याच्या रागातून 19 वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार; आरोपी फरार, पोलिसांकडून गुन्हा दाखल

मामेबहिणीशी बोलण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून 19 वर्षीय तरुणाची चाकूने वार करून संपवण्यात आले आहे.
chhatrapati sambhajinagar crime news
chhatrapati sambhajinagar crime news

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या गारखेडा परिसरात मामेबहिणीशी बोलण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून 19 वर्षीय तरुणाची चाकूने वार करून संपवण्यात आले आहे. साईनगर परिसरात बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. तौसिफ शमीम शेख असे मृत तरुणाचे नाव असून, आदित्य शेळके याने त्याच्यावर धारदार चाकूने सपासप वार केल्याचा आरोप आहे. सुरुवातीला दोघांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी आरोपीने तौसिफला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. त्यानंतर घराबाहेर मोटारसायकलवर बसून मोबाईल पाहत असलेल्या तौसिफवर आरोपीने अचानक हल्ला केला. छाती, चेहरा आणि डोक्यावर गंभीर वार झाल्याने तौसिफचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, पुंडलिकनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

हेही वाचा : मुंब्रा हिरवा करण्याचा इशारा देणाऱ्या सहर शेखच्या वडिलांच्या खांद्यावर शिवसेनेचा भगवा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version