प्रेमसंबंधाच्या संशयातून महिला कर्मचाऱ्यावर चाकूने सपासप वार; जागीच मृत्यू, अहिल्यानगरमध्ये खळबळ

भिंगार परिसरातील वडारवाडी ग्रामपंचायत कार्यालयात महिला कर्मचाऱ्याला जीवे मारण्यात आले.

प्रेमसंबंधाच्या संशयातून महिला कर्मचाऱ्यावर चाकूने सपासप वार; जागीच मृत्यू, अहिल्यानगरमध्ये खळबळ

अहिल्यानगर येथील वडारवाडी ग्रामपंचायत कार्यालयातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेचा मृत्यू झाला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

नेमकी घटना काय?

भिंगार परिसरातील वडारवाडी ग्रामपंचायत कार्यालयात एका 42 वर्षीय महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. अनिता देविदास आळकुटे असे मृत महिलेचे नाव असून, ती ग्रामपंचायत सफाई कर्मचारी म्हणून काम करत होती. संतोष नाना धोत्रे याने अनिता यांच्यावर चाकू आणि लोखंडी जड वस्तूने डोक्यावर व गळ्यावर वार केल्याचा आरोप आहे.

महाराष्ट्रातील पदवीधर मतदारसंघांच्या निवडणूक निकालासंबंधीच्या सर्व बातम्या एका क्लिकवर-

विधान परिषद मतदारसंघ निकाल | Maharashtra MLC Election Results

प्राथमिक माहितीनुसार, मृत महिला आणि आरोपी यांच्यात गेल्या 10 वर्षांपासून संबंध असल्याचे बोलले जाते. महिलेचे अन्य व्यक्तीसोबत संबंध असल्याच्या संशयातून ही घटना घडल्याची चर्चा परिसरात सुरू होती.

हेही वाचा - साईड देण्यावरून वाद विकोपाला गेला! महागावात बसचालकाला लोखंडी रॉडने मारहाण; व्हिडिओ व्हायरल

घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलिसांनी आरोपी संतोष धोत्रे याला तात्काळ अटक केली. मृतदेह अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पुढील तपास भिंगार पोलीस करत आहेत.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर-

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number