कर्जत-भीमाशंकरच्या जंगलात प्रस्तावित टोरंट प्रकल्पावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. कर्जत तालुक्यातील साई डोंगर येथे प्रस्तावित टोरंट जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पासाठी 20 ऑक्टोबरपासून वृक्षतोड सुरू करण्यात आली होती. या परिसरातील हजारो वृक्षांची तोड करण्यात आल्यानंतर विरोधी पक्ष आणि पर्यावरणप्रेमींनी या वृक्षतोडीला विरोध केला. त्यानंतर सध्या तरी वृक्षतोड थांबवण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यातील कर्जतच्या सायडोंगर परिसरातील प्रस्तावित असलेल्या गुजरातच्या टोरेंट पॉवर कंपनीच्या जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पावरुन आदित्य ठाकरे, राज ठाकरे आणि मनोज जरांगे-पाटील यांनी प्रकल्पाबाबत विरोध दर्शवला आहे. त्यामुळे टोरंट प्रकल्पाचा मुद्दा आता पर्यावरणासोबतच राजकीय पातळीवरही चर्चेत आला आहे. यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी होत असलेली हानी ही तात्पुरत्या स्वरुपाची असल्याचे स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकल्पावर बोलताना म्हणाले की, “मायक्रो फायन्स कंपनी घटना घडली सर्व एसपी आदेश दिले. कोणी ही शेतकरी त्रास देत असेल तर कारवाई करावी. कर्जत पंप स्टोरेज प्रकल्प पर्यावरण पुरक आहे. जगात आज सोलर आणि विन्ड यांना बॅलन्स करण्यासाठी पंपस्टोरेज पद्धत वापरली जाते. प्रकल्प विचार केला 3 हजार मेगावॅट निर्मित होईल. प्रकल्प झाला नाही तर कोळसा वापरावा लागेल. त्यासाठी झाडे तोडावी लागेल.”
पुढील 100 वर्ष पर्यावरण हानी टाळण्यासाठी हा प्रकल्प
“वन विभाग नवीन झाडे लावेल. 60 लाख झाडे लावली जातील प्रकल्प ठिकाणी तसंच इतर ठिकाणी. पुढील 100 वर्ष पर्यावरण हानी टाळण्यासाठी आता प्रकल्प आहे. अभ्यास न करता प्रकल्प माहिती न घेता फक्त विरोध केला जातो. योग्य अभ्यास केला तर विरोध राजकीय कसा आहे हे दिसून येते. काही मुद्दे ग्रामस्थ अजून चांगले काही सांगायचे असेल तर स्वागत यात पर्यावरण हिताचा आमचा प्राधान्य, आरे मेट्रो कारशेड बाबत ही असेच वातावरण केले गेले. ज्यांना राजकारण करायचे त्यांना काही बाकी सांगायच.”