अकोल्यात धक्कादायक दुर्घटना! इमारतीचा काही भाग कोसळून 4 मुली ढिगाऱ्याखाली; एकीचा पाय फ्रॅक्चर

अकोल्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.

अकोल्यात धक्कादायक दुर्घटना! इमारतीचा काही भाग कोसळून 4 मुली ढिगाऱ्याखाली; एकीचा पाय फ्रॅक्चर

अकोल्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. राजपुतपुरा परिसरात आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एका इमारतीचा काही भाग अचानक कोसळला. मिळालेल्या माहितीनुसार, ही इमारत प्रकाश यादव यांची असून इमारतीचा भाग कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

या दुर्घटनेत चार मुली ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या होत्या. सुदैवाने, परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत चारही मुलींना सुखरूप बाहेर काढले. यामध्ये एका मुलीच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठा अनर्थ टळला आहे.

या घटनेची माहिती महापालिका प्रशासनाला देण्यात आली आहे. मात्र, ही इमारत जीर्ण नसतानाही अचानक कशी कोसळली, याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.

हेही वाचा – अडीच लाखांच्या व्यवहारातून विवाह, लग्नानंतर तिघांना जीवे मारण्याचा प्रयत्न; वेल्हाण्यातील विवाह प्रकरणाला धक्कादायक वळण

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number