पवईत खळबळजनक घटना! गरबा खेळायला गेली म्हणून पतीला राग अनावर; पत्नीवर केले चाकूने सपासप वार

मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गरबा खेळायला गेल्याच्या रागातून पतीने पत्नीवर चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना पवईत घडली आहे.
Crime News
Crime News

मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गरबा खेळायला गेल्याच्या रागातून पतीने पत्नीवर चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना पवईत घडली आहे. मुंबईतील पवई येथे गरबा खेळायला गेल्याच्या रागातून संतापलेल्या पतीने पत्नीवर चाकू हल्ला केला असून या घटनेनंतर आरोपी पतीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा- जन्मठेपेची शिक्षा झालेला माजी भाजप नेता लढवणार 2027 ची निवडणूक?; हायकोर्टाकडून दोषसिद्धीला स्थगिती

दरम्यान या चाकू हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महेश रजत असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडिता महिला वैशाली रजत ही रुग्णांची देखभाल करण्याचे काम करते. तर तिचा पती महेश रजत हा एका कँटिनमध्ये सुपरवायझरचे काम करतो आणि या दाम्पत्याला दोन मुले आहेत. दरम्यान शनिवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास वैशाली गरबा खेळायला चालली होती. महेशने तिला गरबा खेळायला जाण्यास मनाई केली.

मात्र वैशाली तरी देखील गरबा खेळायला गेली. त्यानंतर 11 वाजता महेश गरब्याच्या ठिकाणी गेला आणि वैशाली घरी घेऊन येत असताना दोघांमध्ये झटापट झाली. ज्यात त्याने तिच्या पोटावर चाकूने सपासप वार केले. आयआयटी पवईजवळील महात्मा फुले नगरमधील समता मित्र मंडळासमोरील रस्त्यावर शनिवारी रात्री ही घटना घडली असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पार्कसाईट पोलीस ठाण्यात पतीविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version