बारामती-मोरगाव रस्त्यावर वासरांची निर्दयीपणे वाहतूक सुरू असताना कारचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या कारमध्ये तब्बल 18 वासरे कोंबण्यात आली होती. या अपघातात दोन वासरांचा मृत्यू झाला असून इतर वासरे जखमी झाली आहेत. अपघातानंतर चालक पसार झाला असल्याची माहिती समोर आली. ही सर्व दोन महिन्याची वासरे कत्तलीसाठी चालवल्याचे माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणी माळेगाव पोलिसांनी सर्व माहिती घेत मुबिन अल्ताफ कुरेशी, अल्ताफ शफी कुरेशी, आक्रम अल्ताफ कुरेशी सर्व रा. तालुका फलटण जि.सातारा याचे विरुद्ध भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 281 प्राण्यांना क्रुरतेने वागवणे तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत तीन जणांवर माळेगांव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.