पत्नीच्या ओळखीतून घरी येणं-जाणं! शिक्षिकेसोबत केलं भयंकर कृत्य, मुलालाही सोडलं नाही; घटनेने शहरात खळबळ

Crime News : छत्तीसगडमधील सुरजपूर जिल्ह्यात शिक्षिका आणि तिच्या मुलाच्या मृत्यूने खळबळ उडाली होती. आता पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत एका आरोपीला अटक केली आहे. या घटनेमागील कारण आणि तपासात समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. नेमकं काय घडलं आणि पोलिसांपर्यंत आरोपी कसा पोहोचला
क्राईम न्यूज
Crime News

छत्तीसगडमधील सुरजपूर जिल्ह्यात शिक्षिका आणि तिच्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली होती. अखेर पोलिसांनी या दुहेरी हत्याकांडाचा छडा लावून आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणातील मृत शिक्षिकेचे नाव रजनी बरेठ असून तिच्या मुलाचे नाव सुजल बरेठ असे आहे.

आरोपी अन् मृतांची ओळख कशी?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रवेश कुमार याची पत्नी आणि मृत रजनी या एकाच शाळेत शिक्षिका होत्या, अशी माहिती आहे. याच ओळखीमुळे आरोपीचे ही त्यांच्या घरी येणे-जाणे होते. रजनी यांना तब्बल 19 लाख रुपयांचे कर्ज मिळणार होते, ही गोष्ट आरोपीच्या कानावर आली होती. स्वत:वर कर्ज असल्याने तसेच पैशांची गरज असल्याने आरोपीने हा कट रचला.

हेही वाचा- भोर पुन्हा हादरलं! अल्पवयीन मुलीवर दोन चुलत भावांकडून अत्याचार; प्रसूतीनंतर प्रकरण उघडकीस

का केली हत्या?
9 ऑक्टोबर 2026 रोजी आरोपीने रजनी यांच्याकडे पैसे मागितले. पण रजनी यांनी प्रवेशला पैसे देण्यान नकार दिला. संतापलेल्या प्रवेशने स्टीलच्या बाटलीने त्यांच्या डोक्यात जोरात वार केला आणि गळा दाबून हत्या केली. घाबरलेल्या आरोपीने मृतदेह हा बाथरुममध्ये लपवला. या हत्येची माहिती मुलाला कळेल या भीतीने त्याने सुजलला कारमध्ये बसवून जंगलात नेले आणि तोंडाला स्टोल बांधून मारहाण केली.

असा अडकला आरोपी पोलिसांच्या तावडीत
सुजलने कसाबसा आरोपीच्या तावडीतून पळ काढला. मात्र पळताना सिमेंटच्या खांबानेच डोक्यात वार करत त्यालाही ठार केले. सर्व पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने मोबाईल, दागिने लपवले आणि रक्ताने माखलेली कारची मॅट जाळली. मात्र, सीसीटीव्ही आणि तांत्रिक पुराव्यांवरुनच पोलिसांनी आरोपी प्रवेश कुमार याला अटक केली. . पैशाच्या लोभापोटी ओळखीच्याच व्यक्तीने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version