भेसळखोरांचे धाबे दणाणले! नवरात्रोत्सवात FDA ची राज्यभर धडक मोहीम; मुंबईतील 17 नामांकित आस्थापनांवर कारवाई

FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळयुक्त आणि कालबाह्य अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात पुन्हा एकदा कडक कारवाई केली आहे.
भेसळखोरांचे धाबे दणाणले! नवरात्रोत्सवात FDA ची राज्यभर धडक मोहीम; मुंबईतील 17 नामांकित आस्थापनांवर कारवाई

मुंबई प्रतिनिधी – महेंद्र जोईल

FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळयुक्त आणि कालबाह्य अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात पुन्हा एकदा कडक कारवाई केली आहे. नवरात्र उत्सवात राज्यभरात निकृष्ट, असुरक्षित आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधात FDA ने धडक मोहीम राबवली आहे. या मोहिमेंतर्गत पुणे, नाशिक, नागपूर, मुंबई, कोकण आणि छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या प्रमाणावर कारवाया करण्यात आल्या आहेत. जाणून घ्या, या कारवाईत नेमकं काय घडलं…

– कोकण विभागात 1 लाख 7 हजारांचा प्रतिबंधित अन्नसाठा जप्त
– कारवाईत 4 एफआयआर दाखल, 4 जणांना अटक
– छत्रपती संभाजीनगरमध्ये 39 लाखांहून अधिक किमतीचे 17 हजार 784 किलो खाद्यतेल जप्त
– पुणे, नाशिक, नागपूर आणि मुंबईतही अन्नसाठ्यावर कारवाई
– मिठाई, वेफर्स, चकली, भगर, साबुदाणा, सुपारी आणि कुट्टू आट्याचा समावेश
– मुंबईतील 17 आणि छत्रपती संभाजीनगरमधील 2 अन्न आस्थापनांचे परवाने किंवा नोंदणी निलंबित
– मुंबईतील 4 आस्थापनांना 1 लाख 30 हजार रुपयांचा तडजोड दंड

हेही वाचा – “त्यांचा फोन आला अन् ते म्हणाले…” तुकाराम मुंढेंनी सांगितला नानांसोबतचा ‘तो’ शेवटचा प्रसंग; नेमकं काय घडलं होतं?

मुंबईतील ‘या’ नामांकित आस्थापनांचा पर्दाफाश- 
1. मे. अमीना हॉटेल प्लॉट क्र. 8/9/1,2, गजानन कॉलनी, शिवाजी नगर, गोवंडी, मुंबई – 400043.
2. मे. आशिर्वाद सुपर स्टोअर (श्री. प्रभुदास नारायणभाई पटेल) दुकान क्र. 2, गंगोत्री यमुनोत्री पंचशील एन्क्लेव्ह, ए-विंग, कांदिवली (पश्चिम), मुंबई – 400067.
3. मे. ज्युबिलंट फूडवर्क्स लि. (डॉमिनोज पिझ्झा) दुकान क्र. 7, 8, 9, 10 व 39 (कोल्ड स्टोरेज), रांगोळी टाइम कॉम्प्लेक्स, डॉ. आंबेडकर रोड, परळ, मुंबई – 400012.
4. मे. ज्युबिलंट फूडवर्क्स लि. (डॉमिनोज पिझ्झा) शॉप क्र. A-2, पहिला मजला, राज इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स, मिलिटरी रोड, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई – 400059.
5. मे. ज्युबिलंट फूडवर्क्स लि. (डॉमिनोज पिझ्झा) शॉप क्र. 2 ते 6, तळमजला, निर्माण हाइट बिल्डिंग, लिंक रोड, डॉन बॉस्को स्कूलसमोर, बोरिवली (पश्चिम), मुंबई – 400091.
6. मे. थैंक्सगिव्हिंग पॅटिसरी अँड कन्फेक्शनरी 215, दुसरा मजला, नवयुग इंडस्ट्रियल इस्टेट, टोकरसी जीवराज रोड, शिवडी, मुंबई 400015.
7. मे. स्वीट नाइफ रेस्टो प्रा. लि. युनिट क्र. 302, 303 व 304, एव्हरशाइन मॉल, लिंक रोड, चिंचोली बंदरच्या मागे, मालाड (पश्चिम), मुंबई – 400064.
8. मे. जय कल्याण कॅन्टीन सावित्री सदन, 12, एन. एस. रोड, जेव्हीपीडी स्कीम, आरोग्यनिधी हॉस्पिटलसमोर, जुहू, मुंबई – 400049.
9. मे. पॅशन रेस्टॉरंट प्रा. लि. (कार्निव्हल बाय ट्रेसिंड) कृष्णा मिनरल्स, 7 वा मजला, प्लॉट क्र. 27/A, सर्वे क्र. 8, 9 व 10, जुहू तारा रोड व लिंकिंग रोड जंक्शन, सांताक्रूझ (पश्चिम), मुंबई-400049.
10. मे. राजस्थान रेस्टॉरंट (श्री. निजामुद्दीन गुलाम रसूल मकनोजिया)- 752, सिकंदर मॅन्शन, एस. व्ही. रोड, आरटीओ चौकीसमोर, खार (पश्चिम), मुंबई – 400052.
11. मे. दार्जिलिंग लेपचा मोमोज दुकान क्र. A, 293, कामगार नगर, नताशा टॉवरजवळ, न्यू वर्सोवा लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई 400058.
12. मे. मूरजानी हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. (हुंडो पिझ्झा) दुकान क्र. 2, तळमजला, धीरज ग्रँड एसआरए सीएचएस लि., 15 वा रोड, खार (पश्चिम), मुंबई 400050.
13. मे. साहिल हॉटेल (श्री. साजिद इस्माईल) दुकान क्र. 3 व 4, पार्वती नगर, मस्जिद मंदिरसमोर, यारी रोड, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), मुंबई – 400061.
14. मे. वन फॉर द रोड हॉस्पिटॅलिटी (द पेनांग टेबल) दुकान क्र. 1 ते 4, पहिला मजला, नवचंद्र निवास को-ऑप. हौ. सो., शॉपर्स शॉपसमोर, व्ही. पी. रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई – 400050.
15. मे. तृप्ती फरसाण अँड स्वीट्स (श्री. मुकेश गोविंदभाई पटेल) दुकान क्र. 2, कृष्ण कुंज बिल्डिंग, लल्लुभाई पार्क, अंधेरी (पश्चिम), मुंबई 400058.
16. मे. हॉटेल थेरेसा – दुकान क्र. 11/B, तळमजला, चंद्रकांत निवास, कामराज शाळेसमोर, 90 फूट रोड, धारावी, मुंबई 400017. (नोंदणी निलंबन)
17. मे. इन्स्टाकार्ट सर्व्हिसेस प्रा. लि. पोद्दार चेंबर, तळमजला, तोडी इस्टेट, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ, मुंबई – 400013.

 

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version