Saturday, February 15, 2025 04:48:27 AM

Pune
स्टंट करत रील केल्याप्रकरणी गुन्हा

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात स्टंट करणाऱ्या तरुणीवर गुन्हा नोंदवण्यात आला

स्टंट करत रील केल्याप्रकरणी गुन्हा

पुणे : पडक्या इमारतीच्या छतावर एक मुलगी मुलाच्या हाताला लटकून स्टंट करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात स्टंट करणाऱ्या तरुणीवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

सार्वजनिक ठिकाणी स्टंटचा व्हिडीओ करून इतरांना स्टंटचे रील करण्यासाठी प्रोत्साहन देणे ही गंभीर बाब आहे. रील करणाऱ्यांकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जाण्याची शक्यता कमी आहे. यामुळे रीलच्या नादात अपघात होण्याची, जीवाला धोका उत्पन्न होण्याची शक्यता आहे; अशी कारणे देत पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात व्हायरल व्हिडीओत स्टंट करताना दिसत असलेल्या मुलीचा जबाब नोंदवून घेतला जाणार आहे. 

        

सम्बन्धित सामग्री