नगर : नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या सप्तशृंगी गड येथे अन्न व औषध प्रशासनाने (FDA) केलेल्या धडक कारवाईत 1,408.7 किलो अस्वच्छ आणि पामतेलयुक्त मावासदृश्य मिठाईचा साठा जागीच नष्ट करण्यात आला आहे. नवरात्रीदरम्यान होणाऱ्या भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर, अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) नाशिक विभागाने सप्तशृंगी गडावर राबवलेल्या विशेष अन्न सुरक्षा तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत अनेक खाद्य आस्थापनांचा समावेश होता. ज्यामध्ये एफडीएने 13 आस्थापनांवर कारवाई केली आणि तपासणीसाठी 18 अन्नाचे नमुने गोळा केले. एफडीएच्या म्हणण्यानुसार, नष्ट केलेल्या साठ्यामध्ये पाम तेलाचा वापर करून तयार केलेल्या माव्यासारख्या मिठाईंचा समावेश होता. अधिकाऱ्यांना असे आढळून आले की, या उत्पादनांची वाहतूक आणि साठवणूक असुरक्षित परिस्थितीत केली जात होती. त्यावर अनिवार्य लेबलिंग नव्हते. दरम्यान, 5,62,090 किमतीचा हा साठा खाण्यासाठी अयोग्य ठरवून नष्ट करण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.