मोठी अपडेट! उद्योगपती राणा सूर्यवंशी हल्लाप्रकरणी करमाळ्यातील नवनाथ झोळ पोलिसांच्या ताब्यात; रात्री उशिरा बारामतीत दाखल

उद्योगपती राणा सूर्यवंशी यांच्यावर बारामतीतील हल्ला झाल्याप्रकरणी करमाळ्यातील नवनाथ झोळ यांना चौकशीसाठी बारामती पोलिसांनी ताब्यात घेतले.

मोठी अपडेट! उद्योगपती राणा सूर्यवंशी हल्लाप्रकरणी करमाळ्यातील नवनाथ झोळ पोलिसांच्या ताब्यात; रात्री उशिरा बारामतीत दाखल
industrialist rana suryavanshi

बारामती : बारामती विमानतळ परिसरात राणा शिपिंग कंपनीचे मालक राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेला हल्लात मोठी अपडेट समोर आली आहे. उद्योगपती राणा सूर्यवंशी यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी करमाळ्यातील नवनाथ झोळ यांना चौकशीसाठी बारामती पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा भाजप नेते रामदास झोळ यांचे नवनाथ झोळ हे बंधू आहेत. तर रामदास झोळ भोंदू मनोहर भोसले प्रकरणात आरोपी आहे. दरम्यान, करमाळ्यातून नवनाथ झोळ यांना बारामती पोलीस चौकशीसाठी घेऊन गेले असल्याची माहिती आहे. भोंदू मनोहर भोसले प्रकरणात दत्तकला शिक्षण संस्थेचे रामदास झोळ हे सध्या फरार आहेत. तर त्यांची पत्नी माया झोळ अटकेत आहे. अशातच आता उद्योगपती राणा सूर्यवंशी यांच्यावर बारामतीतील हल्ल्याप्रकरणी नवनाथ झोळची चौकशी होणार असून या चौकशीत काही कनेक्शन उघड होतं का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा : मणिपूरमध्ये अतिरेक्यांच्या गोळीबारात 3 नागरिकांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर मृतदेह ठेवत…

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number