गोडीगुलाबीने बोलून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नको ते व्हिडिओ बनवले अन्…; ‘त्या’ मागणीसाठी विद्यार्थ्याने प्रोफेसरलाच ब्लॅकमेल केलं

नाशिकमध्ये प्राध्यापिकेला ब्लॅकमेल करून 5 लाखांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना घडली असून माजी विद्यार्थ्याविरोधात गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोडीगुलाबीने बोलून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नको ते व्हिडिओ बनवले अन्…; ‘त्या’ मागणीसाठी विद्यार्थ्याने प्रोफेसरलाच ब्लॅकमेल केलं
Nashik Crime

नाशिकमधून शिक्षक आणि विद्यार्थी नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राध्यापिकेला ब्लॅकमेल करून 5 लाखांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना घडली असून माजी विद्यार्थ्याविरोधात गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, माजी विद्यार्थ्याने प्राध्यापिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अश्लील व्हिडिओ स्क्रीन रेकॉर्ड केले आणि त्यानंतर तिला ब्लॅकमेल केल्याचा आरोप विद्यार्थ्यावर करण्यात आला आहे. यावेळी विद्यार्थ्याने प्राध्यापिकेचे अश्लील व्हिडिओ आणि चॅट्स व्हायरल करण्याची धमकी देत 5 लाखांची खंडणी मागितली, इतकचं नव्हे तर नकार दिल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला समाजात बदनाम करण्याची धमकी दिली.

हेही वाचा- निष्काळजीपणा जीवावर बेतला! रायफलची साफसफाई करताना चुकून गोळी सुटली; माजी नगरसेवकाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

त्याचसोबत महाराष्ट्राबाहेर सहलीला येण्यासाठीही संशयिताकडून दबाव टाकण्यात आला होता. यावेळी पीडित प्राध्यापिका अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्याने अट्रोसिटी अंतर्गत संशयित आरोपी चेतन ओढे (राठोड), याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या मोबाईल, लॅपटॉपसह अन्य गॅजेट्स जप्त करून सायबर फॉरेन्सिक तपास सुरू असून माहिती तंत्रज्ञान कायदा आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले असून प्रकरणाचा पुढील तपास गंगापूर पोलिसांकडून सुरू आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number