भयंकर! उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात अंधाधून गोळीबार; एकाचा जागीच मृत्यू, पोलीस घटनास्थळी दाखल

उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात अंधाधूंद गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे.
ulhasnagar railway station
ulhasnagar railway station

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात अंधाधूंद गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. हल्लेखोरांनी दोन राउंड फायर केल्याची पोलिसांनी प्राथमिक माहिती दिली आहे. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. यानंतर आता विठ्ठलवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृत्यू व्यक्तीचे नाव हरीश गझवानी असं असल्याचे समोर आले आहे. पूर्ववैमनस्यातून गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेतील हल्लेखोर फरार झाला आहे. या घटनेमुळे स्टेशन परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहे.

बातमी अपडेट होत आहे…

हेही वाचा : ‘नाही तर व्हिडिओ व्हायरल करेन’ 13 वर्षांच्या चिमुकलीवर धर्मांतरासाठी दबाव; नमाज पठनासह हिजाब घालण्यास प्रवृत्त केलं, जबरदस्ती संबंध अन्…

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version