दुर्दैवी घटना! जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; 3 तरुणांचा जागीच मृत्यू

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर भीषण दुर्घटना झाली असून यात 3 तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

दुर्दैवी घटना! जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; 3 तरुणांचा जागीच मृत्यू

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर आज पहाटे कार आणि कंटेनरमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतांची नावे पंकज प्रकाश चौधरी, हरीश हिंमत चौधरी आणि रवींद्र अरुण चौधरी अशी असून तिघेही एकमेकांचे नातेवाईक आहेत. तिघेही धरणगाव तालुक्यातील झुरखेडे गावचे रहिवासी होते.

नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, हे तिघे जण भुसावळ जवळील वानोळा येथे साईबाबा यात्रेसाठी गेलेल्या आपल्या नातेवाईकाला सोडण्यासाठी कारने गेले होते. तिथून परत झुरखेडे या आपल्या गावी येत असताना हा अपघात घडला. बांभोरी उड्डाणपुलावर समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनरने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि कार जागेवरच 2 ते 3 वेळा फिरली. तर धडकेनंतर कंटेनरही उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकला आणि खाली पडण्यापासून थोडक्यात बचावला.

अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिन्ही मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी जळगावच्या वैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.

हेही वाचा – सुखाच्या संसारात रक्तरंजित वळण! आधी भयंकर कृत्य, त्यानंतर जे घडलं त्याने सर्वांनाच बसला धक्का

बायपास बंद, अपघात वाढले
पाळधी-तरसोद बायपास बंद असल्याने सर्व अवजड वाहनांची वाहतूक जळगाव शहरातून वळविण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील बांभोरी, शिव कॉलनी उड्डाणपुलावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मागील अडीच महिन्यांत या मार्गावर 12 जणांचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेनंतर मृत तरुणांच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून पुढील तपास सुरू आहे.

(महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर) –

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number