हृदयद्रावक घटना! भटक्या कुत्र्याचा चिमुकलीवर जीवघेणा हल्ला, एक डोळा गमावला

जामखेड तालुक्यातील बेल्हेकर वस्ती येथून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.
हृदयद्रावक घटना!  भटक्या कुत्र्याचा चिमुकलीवर जीवघेणा हल्ला, एक डोळा गमावला

अहिल्यानगर प्रतिनिधी – गिरीश रासकर

जामखेड तालुक्यातील बेल्हेकर वस्ती येथून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. अंगणात खेळत असलेल्या दीड वर्षाच्या चिमुकलीवर पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी झाली असून तिचा एक डोळा निकामी झाल्याची दुःखद माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?
बेल्हेकर वस्ती येथे आपल्या अंगणात ही चिमुकली खेळत असताना अचानक पिसाळलेल्या कुत्र्याने तिच्यावर झडप घातली. या हल्ल्यात तिच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत. विशेषतः डोळ्याला गंभीर इजा झाल्याने तिचा एक डोळा निकामी झाला आहे. घटनेनंतर कुटुंबीयांनी तातडीने तिला पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केले. मात्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने उपचाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.

हेही वाचा – तीर्थयात्रेदरम्यान चिमुकलीसोबत भयंकर घटना; आई-वडील जेवायला गेले अन्…; मन सुन्न करणारी घटना

राम शिंदे यांनी केली मदत
ही बाब विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना समजताच त्यांनी तातडीने हस्तक्षेप केला. त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधून चिमुकलीच्या उपचाराची सर्व व्यवस्था केली आहे. धर्मादाय ट्रस्टच्या माध्यमातून आणि उर्वरित अतिरिक्त खर्च स्वतः उचलण्याची ग्वाही राम शिंदे यांनी दिली आहे.

राम शिंदे यांच्या या तातडीच्या मदतीबद्दल कुटुंबीयांनी आभार मानले असून, गावातील भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. मात्र दिवसेंदिवस अशा घटना वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version