हॉटेलच्या खोलीत गेली अन् काही सेकंदांतच मागे कोसळली! नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू; घटनेचा CCTV Video समोर

या व्हिडिओमध्ये काही व्यक्ती हॉटेलच्या गॅलरीतून जात असून, त्यामागे मुस्कान खोलीच्या दिशेने जाताना दिसत आहे. यानंतर ती थेट खाली कोसळते.
Death
Death

Newlywed Woman Collapses upon Entering Hotel Room and Dies: उत्तर प्रदेशातील झाशी शहरातून एक अत्यंत खळबळजनक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे, जिथे लग्नाला अवघे 3 महिने झाले असताना एका 28 वर्षीय नवविवाहितेचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. मुस्कान सिदौलिया असे मृत तरुणीचे नाव असून, ती रेल्वेमध्ये ज्युनियर इंजिनिअर (JE) ची परीक्षा देण्यासाठी आपल्या माहेरी आली होती. हॉटेलच्या खोलीत प्रवेश करताच ही महिला अचानक खाली कोसळल्याचा एक 47 सेकंदांचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात आणि दोन्ही कुटुंबांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे.

हॉटेल रूम नं. 212 मधील सीसीटीव्ही फुटेज; खोलीत जाताच खाली कोसळली मुस्कान
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हायरल होत असलेला सीसीटीव्ही फुटेज झाशी येथील ‘ऋषभ हॉटेल’चा असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओमध्ये काही व्यक्ती हॉटेलच्या गॅलरीतून जात असून, त्यामागे मुस्कान खोलीच्या दिशेने जाताना दिसत आहे. ती खोलीच्या दाराजवळ पोहोचताच अवघ्या 6 सेकंदांच्या आत अचानक जमिनीवर कोसळल्याचे यात स्पष्टपणे दिसून येते. तातडीने तिला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सुरुवातीला पतीने ती पाय घसरून पडल्याचा बनाव रचला होता, मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे अनेक गंभीर शंका उपस्थित होत आहेत.

रेल्वे परीक्षेसाठी माहेरी आली होती मुस्कान
मृत मुस्कानची 28 ऑक्टोबर रोजी रेल्वे विभागात ज्युनियर इंजिनिअर पदाची परीक्षा होणार होती, यासाठी तिचे वडील रामजी लाल यांनी 10 ऑक्टोबर रोजी तिला सासरहून झाशीला आणले होते. वडिलांच्या म्हणण्यानुसार, 23 ऑक्टोबरच्या रात्री तिचा पती आणि बँक मॅनेजर असलेला निलेश झाशी येथे पोहोचला. तो मावशीच्या घरी नेण्याच्या बहाण्याने मुस्कानला आपल्यासोबत घेऊन गेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा कुटुंबीयांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा निलेशने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि नंतर ती रुग्णालयात असल्याचे सांगितले. जेव्हा कुटुंबीय रुग्णालयात पोहोचले, तोपर्यंत मुस्कानचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा – हृदयद्रावक! ‘आम्हाला एकमेकांपासून कधीही वेगळं करू नका’; भावूक व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर ‘त्या’ जोडप्याचा रेल्वे रुळावर मृतदेह

माहेरच्या लोकांकडून हत्येचा गंभीर आरोप; पतीचे पहिले लग्न लपवल्याची माहिती समोर
मुस्कानच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी तिचा पती निलेशवर हत्येचा अत्यंत गंभीर आरोप केला आहे. निलेशने आपले पहिले लग्न लपवून मुस्कानशी दुसरे लग्न केले होते आणि लग्नानंतर तो सतत तिच्यात आणि पहिल्या पत्नीमध्ये तुलना करून तिला टोमणे मारत असे, असा दावा वडिलांनी केला आहे. मुस्कानच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली असून तिचे तोंड दाबून तिला भिंतीवर आदळले असावे, असा संशय तिच्या कुटुंबीयांकडून व्यक्त केला जात आहे. या गंभीर आरोपांची दखल घेत पोलिसांनी पती निलेशला तातडीने ताब्यात घेतले असून कसून चौकशी सुरू केली आहे.

पोलिसांकडून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन सुरू; अहवालानंतर होणार कारवाई
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी ऋषभ हॉटेलची पाहणी केली असून खोली क्रमांक 212 मधील सर्व पुरावे गोळा केले आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोर्स्टमार्टमसाठी पाठवला असून वैद्यकीय अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. वडिलांनी केलेल्या हत्येच्या तक्रारीच्या आधारावर पोलीस तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सखोल तपास करत आहेत. या संपूर्ण प्रकरणातून आणखी कोणते नवीन खुलासे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – प्रियकरासाठी पत्नीने रचला धक्कादायक कट; YouTube वर पाहिलं अन् पुढे जे घडलं…

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version