साडेपाच वर्षांचं नातं, ती दरीत कोसळली, पण…, इंजिनियर तरुणीच्या प्रकरणात ट्विस्ट! प्रियकराचा जबाब पण चॅट हिस्ट्रीतून वेगळीच कहाणी समोर

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात प्रेयसीचा विवाह ठरला या रागातून प्रियकराने तरुणीचे अपहरण करून तिला दरीत ढकलून दिल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे.
Kolhapur Crime
Kolhapur Crime

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात प्रेयसीचा विवाह ठरला या रागातून प्रियकराने तरुणीचे अपहरण करून तिला दरीत ढकलून दिल्याची घटना समोर आली होती. कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील शिवडाव नाईकवाडी येथील तरुणी तरन्नुम नाईक या इंजिनियर तरुणीला तिचाच प्रियकर श्रीपाद दिनकर वडार याने 1000 फूट खोल दरीत ढकलून दिलं ज्यात तिचा मृत्यू झाला.

आरोपी प्रियकर श्रीपाद वडर याने दिलेल्या जबाबानंतर भुदरगड पोलिसांनी तपास सुरू करत आरोपी श्रीपाद वडर याला अटक केली होती. दरम्यान या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणारी तरन्नुम नाईक हिचे गेले साडेपाच वर्षांपासून श्रीपाद दिनकर वडार याच्यासोबत प्रेमसंबंध होते.

हेही वाचा- ‘वडील सर्व सांभाळून घेतील’, अपघातानंतर पैशेवाल्या पोराचं चीड आणणारं विधान; मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत तिघांना चिरडलं

तरन्नुम नाईक ही गरगोटी येथे आपल्या आजीसोबत राहत होती. तरन्नुमच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसरीकडे ठरवल्यामुळे दोघंही अस्वस्थ होते. दोघांनी एकत्र आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला होता. ठरल्याप्रमाणे तरन्नुमने कसलाही विचार न करता 1000 फूट खोल दरीत उडी मारली. तिला पाहून श्रीपादने आपला निर्णय मागे घेतला. ऐनवेळी दरीत उडी मारण्याचं त्याचं धाडस झालं नाही.

त्यानंतर आरोपी श्रीपाद वडार यानेच पोलीस ठाण्यात जाऊन माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने बॉडी बाहेर काढली. श्रीपादने दिलेल्या या माहितीमुळे या प्रकरणात मोठी खळबळ उडाल्याचं समोर येत आहे. पोलिसांनी दोघांची चॅट हिस्ट्री चेक केली, तेव्हा पोलिसांनी दोघांच्या आत्महत्येच्या प्लॅनिंगविषयी काहीही माहिती मिळाली नाही. पोलिसांनी आरोपीवर हत्येसाठी बीएनएस कलम 103(1) लागू केलं आहे. त्यामुळे आता प्रियकराचा पाय खोलात गेल्याचं पहायला मिळतंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version