केरळमधील पथनमथिट्टा या जिल्ह्यात 2023 ऑगस्ट मध्ये घडलेल्या एका अतिशय हृदयद्रावक घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. बाळ फक्त रडत असल्याच्या रागातून अवघ्या 8 महिन्यांच्या चिमुरडीची गळा दाबून हत्या करत तिचा मृतदेह हा दलदलीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आलेला आहे. या प्रकरणात तीन वर्षानंतर चक्क पीडित चिमुकलीच्या 38 वर्षीय आई मंजू हिला पोलिसांनी अटक केली आहे.
तीन वर्षांनी प्रकरणाला नवं वळण
मिळालेल्या माहितीनुसार, 2023 या वर्षी मंजू आणि तिच्या पती इसाक्कीमध्ये वाद झाला होता. त्यानंतर ती आपल्या मुलीसह घर सोडून अलप्पुझा येथे गेली. कलारकोड येथील एका दुकानाजवळ तिची ओळख शिवन या नावाच्या व्यक्तीशी झाली. दोघांमध्ये ओळख वाढताच ती त्याच्यासोबतच चांगनास्सेरी येथे एका दुकानाच्या पडवीमध्ये राहू लागली होती.
काही दिवस गेले आणि 2023 च्या एका रात्री चिमुकली झोपेतून उठून रडू लागली होती. फक्त चिमुकली रडत असल्याने संतापलेल्या शिवनने तिचा गळा दाबून तिला संपवले. हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने आपला धाकटा भाऊ शक्ती याला बोलावले. तिघांना मिळून चिमुकलीचा मृतदेह स्कूटरवरुन नेला आणि वलंजवट्टोम येथील गवताळ असलेल्या दलदलीत फेकून दिला. घटनेच्या 12 ऑगस्ट रोजी साधारण सायंकाळी हा मृतदेह पोलिसांना आढळून आला. लेकीसोबत झालेल्या या प्रकारानंतर मंजू ही पालक्कड जिल्ह्यातील वसाहतीत परतली, पण तिच्यासोबत तिची चिमुकली नसल्याने स्थानिकांना संशय आला.
तीन वर्षांनी आईला अटक
स्थानिकांनी मंजूला चिमुकलीबाबत अनेक प्रश्न विचारले. मात्र, तिच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने काही नागरिकांनी मीनाक्षीपुरम पोलिसांना याबाबतची माहिती दिली. अखेर पोलिसांनी केलेल्या चौकशीत मंजूने गुन्ह्याची कबूली दिली असून न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी शिवन आणि त्याचा भाऊ शक्ती यांचा पोलीस शोध घेत आहेत.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.