मुंबई-गोवा महामार्गावर काळाचा घाला! इंदापूरजवळ कार उलटून एक ठार; 5 जण गंभीर जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर काळाचा घाला! इंदापूरजवळ कार उलटून एक ठार; 5 जण गंभीर जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. इंदापूरजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार उलटली. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही कार मुंबईहून रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथे जात होती. अचानक कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

हेही वाचा – अकोल्यात धक्कादायक दुर्घटना! इमारतीचा काही भाग कोसळून 4 मुली ढिगाऱ्याखाली; एकीचा पाय फ्रॅक्चर

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले आहे.

या दुर्घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number