आई-वडिलांच्या समोर पोटच्या लेकीचा अंत; तर पालकांची प्रकृती चिंताजनक; नेमकं घडलं काय?

पिंपरी-चिंचवड शहरातील KSB चौकाजवळ आज एक दुदैवी अपघात घडला आहे
आई-वडिलांच्या समोर पोटच्या लेकीचा अंत; तर पालकांची प्रकृती चिंताजनक; नेमकं घडलं काय?

पिंपरी-चिंचवड शहरातील KSB चौकाजवळ आज एक दुदैवी अपघात घडला आहे. दुचाकीने ट्रॅक्टरला मागून जोरात धडकल्याने झालेल्या अपघातात 8 वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला असून तिचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, फरान मोमीन (वय 32) हे आपली पत्नी मारिना फरान मोमीन आणि मुलगी हातिन फरान मोमीन (वय 8) हिच्यासोबत दुचाकीवरून जात होते. KSB चौकाजवळ समोर असलेल्या ट्रॅक्टरला त्यांच्या दुचाकीने मागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, 8 वर्षीय हातिनचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा – मालमत्तेच्या वादातून नातवाने आजीचा जीव घेतला; एवढ्यावर तो थांबला नाही…; ते कृत्य पाहून पोलिसही हादरले

या अपघातात फरान मोमीन आणि मारिना मोमीन हे दोघेही जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, अपघातानंतर ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टरसह घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version