पिंपरी-चिंचवड महापालिकेत ACB ची धाड! थेट मुख्य अधिकाऱ्याला बेड्या

पिंपरी चिंचवड पालिकेत एसीबीचा छापा, थेट मुख्य अभियंता एसीबीच्या जाळात छापा टाकला, यात थेट वर्ग-1 च्या मुख्य अभियंता पदाचा मोठा अधिकारी जाळ्यात अडकला आहे.
Pimpri Chinchwad
Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड पालिकेत एसीबीचा छापा, थेट मुख्य अभियंता एसीबीच्या जाळात छापा टाकला, यात थेट वर्ग-1 च्या मुख्य अभियंता पदाचा मोठा अधिकारी जाळ्यात अडकला आहे. मुख्य अभियंता प्रवीण ओंबासे असं या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. एका ठेकेदाराला काम मिळवून देण्यासाठी 19 हजार रुपयांची ओंबासे यांनी मागणी केली होती, तसा आरोप ठेकेदाराने केला होता.

त्याची शहानिशा करुन आज एसीबीने थेट महापालिकेच्या इमारतीत छापा टाकला. धक्कादायक म्हणजे विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता संपली असं अद्याप जाहीर झालेलं नाहीये. अशा प्रसंगी काम मिळवून देण्यासाठी 19 हजारांची मागणी करण्यात आली.

हेही वाचा- प्रशासकीय वर्तुळात खळबळ! एकाच वेळी 12 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

महापालिकेतील इतक्या बड्या अधिकाऱ्यावर थेट दालनातच एसीबीने धाड टाकल्याने महापालिकेच्या प्रशासकीय वर्तुळात एकच प्रचंड खळबळ उडाली आहे. एसीबीच्या पथकाने अत्यंत गोपनीयरीत्या या तक्रारीची पडताळणी केली असता, ओंबासे यांनी कामाच्या बदल्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची आणि अटकेची पुढील कायदेशीर कारवाई वेगाने सुरू आहे. विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता संपत असतानाच्या संवेदनशील काळातही इतक्या वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्याने लाचेची मागणी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version