भोळा चेहरा, पण कारनामे भलतेच! बसमध्ये महिलांचा खेळ संपला; नक्की घडलं काय?

वाशिममधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बसमध्ये दागिने चोरणाऱ्या महिला टोळीला अटक करण्यात आली आहे.
Washim Crime News

वाशिममधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बसमध्ये दागिने चोरणाऱ्या महिला टोळीला अटक करण्यात आली आहे. चार महिलांच्या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. वाशिम येथील बसमधील प्रवाशांच्या बॅगेतून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या या टोळीत 4 महिलांचा समावेश आहे.

वाशिम येथे बसमधून प्रवास करणाऱ्या 70 वर्षीय वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले. वाशिमच्या मंगरूळपीर येथून अकोल्याकडे जाणाऱ्या बसमध्ये ही घटना घडली. वृद्ध महिलेच्या बॅगेत सोन्याचे जुने वापरातील दागिने आणि 28,000 रुपये रोख, असा एकूण 1,78,000 रुपयांचा मुद्देमाल होता.

हेही वाचा – धक्कादायक बातमी! माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जीवर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न; आरोपी महिलेच्या हातात…

शेलूबाजार येथे चारही महिला चोरी करून बसमधून उतरल्या. वृद्ध महिलेने बॅग तपासली असता दागिने आणि रोकड असलेली पिशवी गायब असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने लगेच आरडाओरड केल्यानंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने कारवाई केली. संबंधित महिला ज्या रिक्षातून जात होत्या, त्या रिक्षाचा पोलिसांनी पाठलाग केला.

पोलिसांनी रिक्षा थांबवल्यानंतर तक्रारदार महिला घटनास्थळी पोहोचल्या. यावेळी रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलांनी चोरी केल्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांचा तपास सुरू असून, या टोळीने यापूर्वी केलेल्या गुन्ह्यांची चौकशीही सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version