नात्याला काळीमा! पत्नीसोबत अमानुष कृत्य करत थेट देवघरात जाऊन ते ठेवलं; मुलाने वडिलांनाही सोडलं नाही

Crime News : पश्चिम बंगालमधील बांकुरा जिल्ह्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. एकाच कुटुंबातील दोन जणांचा मृत्यू झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी संशयिताला अटक केली असून, हत्येमागील कारणांचा शोध सुरू आहे.

नात्याला काळीमा! पत्नीसोबत अमानुष कृत्य करत थेट देवघरात जाऊन ते ठेवलं; मुलाने वडिलांनाही सोडलं नाही
Crime News

पश्चिम बंगालमधून माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आलेली आहे. बांकुरा जिह्यातील सोनामुखी येथे एका व्यक्तीने पत्नीची अत्यंत क्रूरपणे हत्या करत तिचं शीर देवघरात नेऊन ठेवलं आणि त्यानंतर वडिलांची हत्या केली. ही थरारक घटना सोमावारी रात्री घडली.

नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपीचे नाव मंगल चौधरी असे असून त्याने 39 वर्षीय पत्नी रुम्पा चौधरी हिची धारदार शस्त्राने आधी निर्घृण हत्या केली. या हत्येनंतर आरोपीने पत्नीचं मुंडकं हे धडावेगळं करत घरातील देवघरात असलेल्या त्रिशुळासमोर ठेवलं. एवढ्यावर मंगल थांबला नाही, त्याने 60 वर्षीय वडील राजेंद्र चौधरी यांचीही हत्या केली. एकाच रात्री परिसरातील एकाच कुटुंबातील दोन जणांचे मृतदेह मिळाल्यानं संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – स्वतःच पोलिसांना फोन करून सांगितलं असं काही; मुंबईत काही क्षणांत उडाला थरार; नेमकं घडलं काय?

या हत्येनंतर आरोपी हातात चाकू घेऊन गावातच फिरत होता. त्याला पाहून परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झालेली होती. संबंधित घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांनी देताच घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले. घटनास्थळावरुन आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना काही वेळ झटापट करावी लागली. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

त्यानंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या दुहेरी हत्येमागचं नेमकं कारण काय आहे, हे अद्याप समोर आलेले आहे. सखोल तपासानंतरच या हत्याकांडाचं खरं कारण समोर येईल.

 

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

विजयादशमीदिनी महत्त्वाच्या घडामोडी | Dussehra Festival News Live

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number