स्वतःच पोलिसांना फोन करून सांगितलं असं काही; मुंबईत काही क्षणांत उडाला थरार; नेमकं घडलं काय?

Mumbai Crime News : मुंबईतील गोराई परिसरात पोलिसांच्या तत्परतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली आहे. संकटात सापडलेल्या महिलेच्या मदतीसाठी पोलिसांनी तातडीने धाव घेतली. पोलीस शिपाई बर्वे यांनी दाखवलेल्या धाडसामुळे या घटनेची सर्वत्र चर्चा होत असून, त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.

स्वतःच पोलिसांना फोन करून सांगितलं असं काही; मुंबईत काही क्षणांत उडाला थरार; नेमकं घडलं काय?
Mumbai Crime News

मुंबई : मुंबईतील गोराई परिसरातून अतिशय थरकाप उडवणारी घटना समोर आलेली आहे. जिथं फक्त आणि फक्त पोलिसांच्या तत्परतेमुळे महिलेसोबत होणारी घटना घडण्यापासून रोखली गेली आहे. नक्की काय घडलं आणि पोलिसांना याबाबत माहिती कशी मिळाली, सविस्तर जाणून घेऊयात.

एका फोन कॉलने बदललं सगळं
मिळालेल्या माहितीनुसार, गोराई पोलीस ठाण्याच्या 100 नंबरवर एका महिलेने फोन करत आपण जीवन संपवल्याचे सांगितले. महिलेचा कॉल येताच पोलीस यंत्रणा तातडीने सतर्क झाली. पुढच्या क्षणी कोणताही वेळ वाया न घालवता नियंत्रण क्षणी नियंत्रण कक्षाकडून या कॉलची माहिती निर्भया पथकाला देण्यात आली. त्यानंतर कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई बर्वे यांनी एका क्षणाचाही उशीर न करता घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा – मिरजेच्या गुंडेवाडीत रक्तरंजित थरार! 30 वर्षीय तरुणावर चाकूहल्ला; घटनेने परिसरात खळबळ

जीवाची पर्वा न करता घेतली उडी
पोलीस शिपाई बर्वे यांना ही महिला समुद्राच्या पाण्यात उतरलेली दिसली आणि तिचा त्यामुळे जीवही धोक्यात आहे. सर्व परिस्थितीचे गांभीर्य ओळखत शिपाई बर्वे यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता थेच पुढच्या क्षणी समुद्राच्या पाण्यात उडी घेतली. त्यांनी धाडसाने त्या महिलेला पाण्यातून बाहेर काढले आणि सुरक्षित ठिकाणी आणले.

जर पोलिसांनी थोडी जरी दिरंगाी केली असती तर तिथं मोठा अनर्थ घडला असता. मात्र, बर्वे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधान तसेच तत्परतेमुळे महिलेचे प्राण वाचले गेले. या घटनेनंतर गोराई पोलीस ठाण्याचे तसेच विशेषता पोलीस शिपाई बर्वे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 

महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

विजयादशमीदिनी महत्त्वाच्या घडामोडी | Dussehra Festival News Live

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number