दक्षिण भारतात राजकीय भूकंप! थलपती विजयनंतर आता ‘या’ अभिनेत्याची राजकारणात एन्ट्री? 3000 हून अधिक पदाधिकाऱ्यांची घेतली भेट

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार थलपती विजय यांच्या यशस्वी राजकारणातील प्रवेशानंतर आता लोकप्रिय अभिनेत्यानेही राजकीय मैदानात उतरण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
दक्षिण भारतात राजकीय भूकंप! थलपती विजयनंतर आता ‘या’ अभिनेत्याची राजकारणात एन्ट्री? 3000 हून अधिक पदाधिकाऱ्यांची घेतली भेट
Thalapathy Vijay this actor now entering politics

दक्षिण भारताच्या चित्रपटसृष्टी आणि राजकारणाच्या पटलावर आणखी एक मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार थलपती विजय यांच्या यशस्वी राजकारणातील प्रवेशानंतर आता लोकप्रिय अभिनेता धनुष यानेही राजकीय मैदानात उतरण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आंध्र प्रदेशात उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि तामिळनाडूत थलपती विजय यांनी राजकीय वर्तुळात आपली पकड मजबूत केल्यानंतर, आता धनुषच्या संभावित राजकीय एन्ट्रीने संपूर्ण दाक्षिणात्य राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

चेन्नईत 3000 हून अधिक पदाधिकाऱ्यांची बैठक

अभिनेता धनुष याने नुकतीच आपल्या अधिकृत फॅन क्लबमधील 3000 हून अधिक महिला पदाधिकारी आणि प्रमुख स्वयंसेवकांची एका विशेष बैठकीत भेट घेतली. चेन्नईच्या बाहेरील एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात ही गोपनीय बैठक पार पडली, ज्या ठिकाणी धनुषचे मोठे बॅनर्स आणि पोस्टर्स झळकवण्यात आले होते. या बैठकीपूर्वीच त्याच्या फॅन क्लबचे नाव बदलून ‘धनुष नरपणी इयक्कम’ (अर्थात धनुष कल्याणकारी चळवळ) असे ठेवण्यात आले आहे. कोइम्बतूर येथे झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत या नामांतराला अधिकृत मान्यता देण्यात आली असून, एका नव्या लोगोचे देखील अनावरण करण्यात आले आहे. या लाल आणि पांढऱ्या रंगाच्या गोलाकार लोगोमध्ये मध्यभागी लाल तारा असून, त्यात धनुषचे हात जोडलेले छायाचित्र आहे.

अधिकृत घोषणा नाही, पण राजकीय चाचपणी सुरू

दरम्यान, धनुषने आपल्या तोंडून अद्याप थेट राजकारणात येण्याची कोणतीही घोषणा केली नसली, तरी त्याच्या या सर्व हालचाली राजकीय वर्तुळात बऱ्याच गोष्टी स्पष्ट करत आहेत. फॅन क्लबचे थेट ‘कल्याणकारी संघटनेत’ रूपांतर करणे आणि राज्यभरात आपले जाळे मजबूत करणे, यावरून तो राजकीय चाचपणी करत असल्याचे स्पष्ट होते. काही महिन्यांपूर्वी 27 जुलै रोजी तिरुवल्लूर येथील एका कार्यक्रमात त्याने चाहत्यांना केवळ सिनेमा किंवा संगीतापुरते मर्यादित न राहता थेट समाजकार्यात उतरण्याचे आवाहन केले होते. चाहत्यांची ताकद हीच आपली खरी शक्ती असल्याचे सांगत त्याने या एकजुटीला योग्य दिशा देण्याचे संकेत दिले होते.

हेही वाचा – ‘सनम तेरी कसम’ फेम मावरा होकेनने दिला गोंडस मुलाला जन्म; मुलाच्या नावाचाही केला खुलासा

दाक्षिणात्य राजकारणात अभिनेत्यांचे वाढते वर्चस्व

तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या राजकारणात सिनेमॅटिक ग्लॅमर आणि चाहत्यांचे जाळे नेहमीच निर्णायक ठरले आहे. थलपती विजय यांनी प्रस्थापित राजकारण्यांना मागे टाकत मोठा राजकीय विजय मिळवल्यामुळे, आता धनुषच्या या नव्या सामाजिक आणि संघटनात्मक पावलाकडे राजकीय विश्लेषक अत्यंत गांभीर्याने पाहत आहेत. आगामी काळात धनुष आपल्या या फॅन क्लबच्या माध्यमातून राजकीय पक्षाची स्थापना करणार की सामाजिक कार्यातच रमणार, याकडे संपूर्ण दाक्षिणात्य मीडियाचे लक्ष लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version