जपानच्या भूमीवर भारताच्या पॅरा खेळाडूंनी इतिहास रचला आहे. आयची-नागोया 2026 आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत 114 पदकांची विक्रमी कमाई केली आहे. जपानमध्ये पहिल्यांदाच झालेल्या या स्पर्धेचा नागोया येथील मिझुहो पार्क अॅथलेटिक्स स्टेडियममध्ये दिमाखदार समारोप झाला.
जपानमध्ये पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या या आठवडाभर चाललेल्या स्पर्धेत 45 देश आणि प्रदेशांमधील सुमारे 4,000 खेळाडू आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.समारोप सोहळ्यात दोन सुवर्णपदके जिंकणारे स्टार खेळाडू निषाद कुमार आणि मोना अग्रवाल यांनी ध्वजवाहक म्हणून भारतीय तुकडीचे नेतृत्व केले, हा भारतासाठी अभिमानाचा क्षण ठरला.
Closing Ceremony: A GRAND FINALE TO AN EXTRAORDINARY JOURNEY! As the Asian Para Games 2026 in Aichi-Nagoya conclude, our flag bearers Nishad Kumar and Mona Agarwal will carry the Tricolour high with immense pride and confidence on 24th Oct. 2026, 2:30 PM IST. 114 MEDALS. 4TH PLACE. ONE PROUD NATION! 🥇🥈🥉 As Team India’s remarkable campaign celebrates sporting excellence, resilience, and unforgettable triumphs, we eagerly await the homecoming of our champions who have brought immense glory to the nation! THE GAMES CONCLUDE. THE GLORY LIVES ON! #AsianParaGames2026 #TeamIndia #Cheer4Bharat #Praise4Para — SAI Media (@Media_SAI) October 23, 2026
भारताने यंदा 30 सुवर्ण, 35 रौप्य आणि 49 कांस्य पदकांसह एकूण 114 पदके जिंकली. यापूर्वी चीनच्या हांगझू येथे 2023 मध्ये झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताने 111 पदके जिंकली होती, तो विक्रम आता मोडीत निघाला आहे.
कोणत्या खेळात सर्वाधिक पदके?
भारताला सर्वाधिक यश पॅरा अॅथलेटिक्समध्ये मिळाले. अॅथलेटिक्समध्ये भारताने 22 सुवर्ण, 19 रौप्य आणि 24 कांस्यसह एकूण 65 पदके पटकावली. त्यानंतर पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताने 3 सुवर्ण, 5 रौप्य आणि 8 कांस्यसह एकूण 16 पदके जिंकली. याशिवाय पॅरा जलतरणात 11, टेबल टेनिसमध्ये 7, तिरंदाजीमध्ये 6, नेमबाजीमध्ये 5 आणि ज्युडो व पॉवरलिफ्टिंगमध्ये प्रत्येकी दोन पदकांची कमाई भारताने केली.दरम्यान, आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेची सहावी आवृत्ती 2030 मध्ये कतारची राजधानी दोहा येथे आयोजित केली जाणार आहे.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर-