अजय देवगणला BMC चा मोठा दणका! जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर चालवला हातोडा

जुहू येथील 'कपोल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी'मध्ये स्थित अजय देवगणच्या बंगल्यात सुरू असलेल्या कथित अनधिकृत बांधकामावर महापालिकेने कारवाई करत अंतर्गत भिंती आणि इतर अनधिकृत भाग पाडून टाकले आहेत.

अजय देवगणला BMC चा मोठा दणका! जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर चालवला हातोडा
Ajay Devgn Juhu bungalow demolition

एकीकडे बॉलिवूड अभिनेता अजय देवगण त्याच्या ‘दृश्यम 3’ या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील घवघवीत यशाचा आनंद साजरा करत आहे, तर दुसरीकडे बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) त्याच्या जुहू येथील बंगल्यावर मोठी धडक कारवाई केली आहे. जुहू येथील ‘कपोल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी’मध्ये स्थित अजय देवगणच्या बंगल्यात सुरू असलेल्या कथित अनधिकृत बांधकामावर महापालिकेने कारवाई करत अंतर्गत भिंती आणि इतर अनधिकृत भाग पाडून टाकले आहेत. हा आलिशान बंगला तब्बल 7802 चौरस फूट परिसरात पसरलेला आहे.

नोटीस देऊनही बांधकाम सुरूच ठेवल्याने कडक पाऊल

मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, अजय देवगणच्या या बंगल्यामध्ये पालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर अंतर्गत फेरबदल केले जात होते. यामध्ये विभाजक भिंती (पार्टिशन वॉल्स) उभारणे, नवीन खिडक्या बसवणे आणि इतर अंतर्गत संरचनात्मक बदल करणे यांसारख्या कामांचा समावेश होता. बीएमसीच्या नियमांनुसार या बदलांसाठी आवश्यक ती मंजुरी घेणे बंधनकारक होते. बीएमसीने यापूर्वीच अभिनेत्याला नोटीस बजावून बांधकाम थांबवण्यास सांगितले होते. मात्र, पालिकेच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत नूतनीकरणाचे काम सुरूच ठेवण्यात आल्यामुळे अखेर बीएमसीने पाडकामाची कडक कारवाई केली.

हेही वाचा –तनुश्री दत्ताचे नानांवर गंभीर आरोप, मुलगा मल्हार पाटेकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘अशा लोकांना मी…’

मुंबई महानगरपालिका बजावली होती नोटीस

बृहन्मुंबई महानगरपालिकेने 10 सप्टेंबर 2026 रोजी ‘मुंबई महानगरपालिका कायद्या’च्या कलम 354-ए अंतर्गत अजय देवगणला पहिली नोटीस बजावली होती. या नोटीसद्वारे नूतनीकरणाचे काम तत्काळ थांबवून आवश्यक मंजुरीची कागदपत्रे सादर करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. परंतु, कोणतीही अधिकृत कागदपत्रे सादर न करता काम पुढे चालू ठेवण्यात आले. त्यामुळे शनिवारी बीएमसीच्या पथकाने बंगल्यावर पोहोचून हातोड्यांच्या साहाय्याने हे अनधिकृत बांधकाम पूर्णपणे जमिनदोस्त केले. या कारवाईची छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number