Homeताज्या बातम्या'छावा'नंतर लक्ष्मण उतेकरांची आणखी एक कलाकृती, 'ईठा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; श्रद्धा कपूरच्या अभिनयाने चाहते भारावले
‘छावा’नंतर लक्ष्मण उतेकरांची आणखी एक कलाकृती, ‘ईठा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; श्रद्धा कपूरच्या अभिनयाने चाहते भारावले
लावणी सम्राज्ञी विठा नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारीत दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि श्रद्धा कपूर अभिनीत 'ईठा' चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून ईठा फिल्म चर्चेत आहे. फिल्मच्या टिझरनेच फिल्मबाबतची उत्सुकता वाढवली होती. श्रद्धा कपूरच्या अभिनयाला दाद मिळाली होती. आता या फिल्मचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्यात श्रद्धा कपूरचा आणखी एक जबरदस्त अंदाज पाहायला मिळाला आहे. 3 मिनिटांचा हा व्हिडीओ आहे, ज्याच्या शेवटच्या 30 सेकंदात श्रद्धा कपूरने महाराष्ट्राची कित्येक मनं जिंकली आहेत.
ट्रेलरमध्ये ईठा बाईंच्या रंगतदार आणि भारदस्त जगाची झलक पाहायला मिळते. इथे महत्त्वाकांक्षेची संघर्षाशी टक्कर होते, आवडीतून ताकद निर्माण होते आणि प्रत्येक कलाविष्कारातून धैर्याची नवी कहाणी समोर येते. लक्षवेधी दृश्ये, मनाला भिडणारे संगीत आणि भावनांचा जबरदस्त आविष्कार यामुळे ‘ईठा’ हा चित्रपट प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर एक भव्य सिनेमॅटिक अनुभव देण्याचे आश्वासन देतो. श्रद्धा कपूर आपल्या आजवरच्या सर्वात वेगळ्या भूमिकांपैकी एका भूमिकेत दिसणार असल्याने या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.