टायगर श्रॉफच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात आता दोन महिलांसह चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. याच कुणाल, सुमित, राधा आणि बबिता या आरोपींचा समावेश आहे. या आरोपींपैकी कुणाल हा मुख्य सूत्रधार अनिल पंडितच्या संपर्कात होता. कुणाल आणि सुमितने राधा-बबिता या दोन तरुणींना शस्त्रे पुरवली, ज्यांनी ती शस्त्रे मुंबईतील दादर येथे नेऊन प्रत्यक्ष गोळीबार करणाऱ्या शूटर्सच्या स्वाधीन केली. तपासानुसार, या महिला आरोपींनी शस्त्रांची व्यवस्था करण्यासह मुंबईत पिस्तूल पोहोचवण्यात कथित भूमिका बजावली. दिल्ली पोलिसांनी पुढील तपासासाठी या चारही आरोपींना मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तसेच या प्रकरणी आरोपींविरोधात BNSS कलम 35(1)(b) अंतर्गत कोर्टात हजर करण्यात आलं. या आरोपींचा गोळीबाराच्या कटात नेमका काय सहभाग होता, तसेच या संपूर्ण प्रकरणामागे आणखी कोणाचा हात आहे का, याचा तपास आता मुंबई पोलीस करत आहेत.
मुंबईत एन्ट्री अन् गोळीबारानंतर पलायन
हरसाना गावातील एका मित्रामार्फत कुणालची गँगस्टर अनिल पंडितशी ओळख झाली होती. त्यानंतर गँगस्टर अनिल पंडितच्या सांगण्यावरून कुणालने अमृतसरमधून एक पिस्तूल आणि 20 काडतुसे मिळवली. एन्क्रिप्टेड ॲपवरून कुणाल आणि अनिल पंडित एकमेकांच्या संपर्कात होते. अनिल पंडितच्या सांगण्यावरून कुणालने अमृतसरमधून 1 पिस्तूल आणि 20 राऊंड घेतले होते. यादरम्यान 2 महिन्यांपूर्वी कुणालची राधाशी ओळख झाली. कुणालने राधाला आपल्या कारवायांची माहिती देत तिच्याशी संबंध निर्माण केले.
कुणालने राधाशी जवळीक वाढवून तिला शस्त्र घेऊन मुंबईला जाण्यास तयार केल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. 15 ऑक्टोबरला कुणालने राधा आणि बबिता यांना नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर सोडले. यावेळी राधाच्या बॅगेत पिस्तूल ठेवण्यात आले होते. 17 ऑक्टोबरला राधा आणि बाबिता या दोन्ही महिला मुंबईतील दादार येथे उतरल्या आणि एका हॉटेलमध्ये थांबल्या. त्यानंतर त्याच दिवशी 11 वाजताच्या सुमारास एका अल्पवयीन मुलाने राधाकडून शस्त्राची बॅग घेतली. त्यानंतर 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास टायगर श्रॉफच्या गाडीवर जुहू येथे गोळीबार करण्यात आला.
गोळीबारानंतर दोघींचे दिल्लीला पलायन
टायगर श्रॉफवर केलेल्या हल्ल्यानंतर अनिल पंडितने कुणालला मुंबईत अडकलेल्या हल्लेखोरांना पळून जाण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. 18 ऑक्टोबरलाच राधा आणि बाबिता दादरहून दादर-हरिद्वार एक्स्प्रेसने दिल्लीला रवाना झाल्या. त्यानंतर घडलेल्या घटनेची माहिी दिल्ली पोलिसांना मिळताच दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने राधा आणि बाबिताला नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर 20 ऑक्टोबरला ताब्यात घेतले. तसेच कुणाल आणि सुमितला हरियाणातील सोनीपत येथून ताब्यात घेण्यात आले.
चार आरोपींची ठिकाणे:
कुणाल (वय 21) — सोनीपत जिल्हा, हरियाणा; अटक सोनीपत येथे.
सुमित (वय 19) — सोनीपत जिल्हा, हरियाणा; अटक सोनीपत येथे.
राधा (वय 23) — उत्तर प्रदेशची रहिवासी; अटक नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर.
बबिता (वय 23) — उत्तर प्रदेशची रहिवासी; अटक नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.