‘शेतातच माझं शेवटचं कार्य व्हावं’ नाना पाटेकरांची अंतिम इच्छा; पार्थिव ‘या’ गावी नेणार, अंत्यसंस्काराची मोठी अपडेट

नाना पाटेकर यांच्यावर पुण्यातील डोनजेगाव भोर तहसील इथे अंत्यसंस्कार होणार आहेत. आज सायंकाळी 4 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे.

‘शेतातच माझं शेवटचं कार्य व्हावं’ नाना पाटेकरांची अंतिम इच्छा; पार्थिव ‘या’ गावी नेणार, अंत्यसंस्काराची मोठी अपडेट
Nana Patekar

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते आणि नटसम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाना पाटेकर यांनी वयाच्या 75व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गोव्यातील डोना पावलामधील राहत्या घरी नाना पाटेकरांना हृदयविकाराचा झटका आला, ज्यात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या आकस्मीत जाण्याने मनोरंजनसृष्टी पोरकी झाली आहे. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. यावेळी त्यांच्या निधनावर मनोरंजन क्षेत्रासह राजकारणी नेत्यांनी देखल दुःख व्यक्त केलं आहे.

दरम्यान आता नाना पाटेकर यांच्या अंतिम संस्काराबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. नाना पाटेकर यांच्यावर पुण्यातील डोनजेगाव भोर तहसील येथील शासकीय इतमामात आज सायंकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. नाना पाटेकर यांची अंतिम इच्छा होती की, त्यांचे शेवटचे कार्य हे पुणे डोणजे येथील शेतामध्येच व्हावे. त्यानुसार पुणे डोणजे गावतच अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यामुळे डोन्जे येथील निवासस्थानी शासकीय इतमामात नाना पाटेकर यांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे.

हेही वाचा- गोव्यातील घरी बेशुद्ध अवस्थेत आढळले, डॉक्टरांचे अथक प्रयत्न, पहाटे 5:20 वाजता…; त्या 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?

विश्वनाथ दिनकरराव पाटेकर उर्फ नाना पाटेकर हे मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव आहे. मराठी रंगभूमीपासून ते मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीपर्यंत त्यांच्या नावाची दखल घेतली जाते. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी वयाच्या 75व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. यावेळी समोर आलेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर त्यांच्या गोव्यातील डोना पौला येथील त्यांच्या घरी बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यामुळे त्यांना तत्काळ मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं.

रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी सुमारे 45 मिनिटे प्रयत्न केले, त्यांना 45 मिनिटे सीपीआर देण्यात आला, परंतु त्या संपूर्ण काळात त्यांच्या हृदयाची हालचाल पुनरुज्जीवित होऊ शकली नाही अन् 5:20 वाजता त्यांचं निधन झालं. या प्रकरणी ‘मेडिको-लीगल केस’ (MLC) नोंदवण्यात आली असून शवविच्छेदन केले जाईल,” अशी माहिती मणिपाल रुग्णालयाच्या ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी ‘एएनआय’ (ANI) या वृत्तसंस्थेला दिली.

Jai Maharashtra Marathi News Live Update

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number