बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या घरावरील गोळीबार प्रकरणात सोनीपत कनेक्शन अधिकच घट्ट होत चालले आहे. मुंबई पोलिसांनी हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील खरखोडा भागातील रोहाना गावातून अमर नावाच्या तरुणाला अटक केली आहे. या प्रकरणात अटक केलेल्या 12 पैकी 9 आरोपी सोनीपत जिल्ह्यातील आहेत.
या प्रकरणात पोलिस तपासात आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे समोर आले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, कुणालने अमरच्या खात्यात 40,000 रुपये पाठवले. कुणालच्या सांगण्यावरूनच अमरने आरोपी राधाच्या खात्यात 12,000 रुपये ट्रान्सफर केले. दरम्यान, अमरच्या अटकेनंतर त्याच्या कुटुंबीयांनी तो निर्दोष असल्याचा दावा केला आहे.
मुलाला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या बँक व्यवहारानंतरच पोलिसांना अमरपर्यंत पोहोचणे शक्य झाले. आतापर्यंत समोर आलेल्या नावांमध्ये रेहान, फूल सिंग, सुमित, कुणाल, जतीन, समीर, अंकित, प्रांजल आणि आता अमर यांचा समावेश आहे. हा पैसा गोळीबाराच्या कटासाठी वापरला गेला का, याचा तपास आता मुंबई पोलीस करत आहेत.