अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांच्या मोठी अपडेट हाती लागली आहे. या प्रकरणी आणखी 5 आरोपींना अटक करण्यात आलेली असून एकूण आरोपींच्या संख्येत वाढ झाली आहे. घटना घडल्यानंतर अवघ्या 15 तासांमध्ये पोलिसांनी 3 आरोपींना अटक केलेली होती. त्यानंतर वेगवान तपास करत आणखी 8 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणात आरोपींची संख्या 10 वर असून 8 आरोपीं ताब्यात घेतल्यानंतर आणखी 2 आरोपी अटकेत आले आहेत.
यात समीर आणि जतीन यांना अटक केली असून समीरने मुख्य आरोपींचा अनिल पंडितशी संपर्क घडवून आणल्याचा आरोप आहे. तर जतिनने गोळीबारासाठी शस्त्रांची व्यवस्था केल्याचा आरोप आहे. त्यामुळे समीर आणि जतिनच्या भूमिकेवर पोलिसांचा विशेष फोकस आहे. तर दुसरीकडे टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणात आता हरियाणातील सोनीपत कनेक्शन उघड झाले आहे.
हेही वाचा- टायगर श्रॉफ प्रकरणात खळबळजनक खुलासा; 8 आरोपींना अटक, दिल्ली ते हरियाणापर्यंत कनेक्शन उघड
टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणात सोनीपत, हरियाणा येथील 7 आरोपींचा समावेश असून फायरिंग प्रकरणातील 10 आरोपींपैकी 7 आरोपी हरियाणातील सोनीपतचे असल्याची प्रथमिक माहिती समोर आली आहे. आरोपींचे शस्त्रपुरवठा आणि हल्ल्याच्या कटाशी कथित संबंध असल्याचा देखील पोलिसांचा संशय आहे. तर हरियाणातील पानिपतशी संबंधित अनिल पंडित हा या कटातील संशयित सूत्रधार असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान या प्रकरणात आरोपींचे सोनीपत कनेक्शन उघड झाले असून टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणात हरियाणातील सोनीपत येथील आरोपींची भूमिका तपासाच्या केंद्रस्थानी आली आहे.
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात दोन महिलांना अटक
टायगर श्रॉफच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात आता दोन महिलांसह चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. याच कुणाल, सुमित, राधा आणि बबिता या आरोपींचा समावेश आहे. या आरोपींपैकी कुणाल हा मुख्य सूत्रधार अनिल पंडितच्या संपर्कात होता. कुणाल आणि सुमितने राधा-बबिता या दोन तरुणींना शस्त्रे पुरवली, ज्यांनी ती शस्त्रे मुंबईतील दादर येथे नेऊन प्रत्यक्ष गोळीबार करणाऱ्या शूटर्सच्या स्वाधीन केली.
तपासानुसार, या महिला आरोपींनी शस्त्रांची व्यवस्था करण्यासह मुंबईत पिस्तूल पोहोचवण्यात कथित भूमिका बजावली. दिल्ली पोलिसांनी पुढील तपासासाठी या चारही आरोपींना मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तसेच या प्रकरणी आरोपींविरोधात BNSS कलम 35(1)(b) अंतर्गत कोर्टात हजर करण्यात आलं. या आरोपींचा गोळीबाराच्या कटात नेमका काय सहभाग होता, तसेच या संपूर्ण प्रकरणामागे आणखी कोणाचा हात आहे का, याचा तपास आता मुंबई पोलीस करत आहेत.