मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी सतत चर्चेत असते. शिल्पा शेट्टी फक्त एक बॉलिवूड अभिनेत्री नसून लोकांना फिट राहण्यासाठी योगा करण्यास प्रोत्साहित करते. सोबतच, शिल्पा शेट्टी मुंबईतील नामांकीत बॅस्टियन रेस्टॉरंटची सह-मालकीण देखील आहे. मात्र, या रेस्टॉरंटमधून शिल्पा शेट्टी किती कमावते, याबाबत अनेकांना प्रश्न पडला आहे. चला जाणून घेऊया.
मुंबईतील बॅस्टियन रेस्टॉरंटमधून शिल्पा शेट्टी दररोज कितीची कमाई करते, याबाबत प्रसि्द्ध लेखिका शोभा डे यांनी खुलासा केला आहे. एका मुलाखतीदरम्यान, प्रसिद्ध लेखिका शोभा डे म्हणाल्या की, 'शिल्पा शेट्टी बॅस्टियन रेस्टॉरंटमधून जवळपास 2-3 कोटींची कमाई करते. इतकंच नाही, तर इथे येण्यासाठी अनेकजण प्री-बुकिंगही करतात. विशेष म्हणजे, विक डेजमध्ये 2 कोटी आणि विकेंडमध्ये शिल्पा शेट्टी जवळपास 3 कोटींची कमाई करते. जेव्हा मला हे समजले, तेव्हा मी आश्चर्यचकित झाले. तेव्हा मी स्वत: याठिकाणी गेले आणि हे खरंच आहे का? याची शहानिशा केले'.
हेही वाचा: Deepika Padukone And Ranveer Singh Dughter first Look : किती ते गोंडस ! अखेर दीपिका-रणवीरच्या लेकीचा चेहरा समोर
पुढे शोभा डे म्हणाल्या की, 'बॅस्टियन रेस्टॉरंट जवळपास 21 हजार चौरस फूट जागेत पसरलेलं आहे. इथे गेल्यावर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही एका वेगळ्याच दुनियेत आला आहात. या रेस्टॉरंटमधून तुम्हाला 360 डिग्रीमध्ये मुंबई शहराचा दृष्य पाहायला मिळतो. बॅस्टियन रेस्टॉरंटमध्ये दोन स्लॉट असतात. प्रत्येक स्लॉटमध्ये 700 लोक बसू शकतात, तर या रेस्टॉरंटमध्ये दिवसभरात 1400 लोक येऊ शकतात'. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने 2019 मध्ये मध्ये रणजीत बिंद्रा यांच्यासोबत बॅस्टियन ब्रँडमध्ये भागीदारी केली आणि आता ती भारतातील अनेक बॅस्टियन रेस्टॉरंट्सची सह-मालकीण आहे. रणजीत बिंद्रा बास्टियन ब्रँडचे संस्थापक आणि या रेस्टॉरंटचे मालक आहेत.