मुंबई: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) आपल्या सदस्यांच्या सोईसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता ईपीएफ खात्यातील पैसे काढण्याचे नियम अधिक सोपे आणि पारदर्शक करण्यात आले आहेत. या बदलांमुळे सदस्यांना आर्थिक गरडेच्या वेळी तात्काळ मदत मिळेल आणि प्रक्रिया अधिक जलदगतीने पार पडेल.
'हे' आहेत मोठे बदल
पहिला मोठा बदल म्हणजे पैसे काढण्याचे नियम सोपे करण्यात आले आहेत. पूर्वी अंशत पैसे काढण्यासाठी 13 वेगळ्या तरतुदी होत्या, मात्र आता त्या फक्त तीन श्रेणींमध्ये विभागल्या गेल्या आहेत: आवश्यक गरजा (उदा. आजार, शिक्षण, लग्न, इत्यादी.), घरांच्या गरजा आणि विशेष परिस्थिती. त्यामुळे सदस्यांना कोणत्या कारणासाठी पैसे काढता येतील हे समजणे सोपे झाले आहे.
दसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे सदस्यांना त्यांच्या खात्यातील 100% पर्यंत अंशत: पैसे काढण्याची परवानगी मिळणार आहे. यात कर्मचारी आणि नियोजनकर्ता दोघांचेही योगदान समाविष्ट असेल. यापूर्वी ही मर्यादा कमी होती, पण आता ती पूर्णपणे उदार करण्यात आली आहे.
तिसरा बदल म्हणजे सेवा कालावधीतील कपात: पूर्वी पैसे काढण्यासाठी ठराविक वर्षांची सेवा आवश्यक होती, पण आता ही मर्यादा फक्त 12 महिन्यांवर आणली आहे. यामुळे, नव्या कर्मचाऱ्यांनाही जलद लाभ मिळेल.
चौथी सुधारणा म्हणजे कागदपत्रांची आवश्यकता रद्द करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्ती किंवा बेरोजगारीच्या परिस्थितीत कारण न देता सदस्य पैसे काढू शकतात. अखेर, सदस्यांनी त्यांच्या खात्यात 25% किमान शिल्लक ठेवणे गरजेचे आहे, ज्यामुळे त्यांना 8.25% वार्षिक व्यजदराचा आणि चक्रवाढ व्याजदराचा लाभ मिळत राहील. या निर्णयांमुळे ईपीएफओ सदस्यांना आर्थिक स्वातंत्र्य आणि सुरक्षिततेचा नवा आधार मिळणार आहे.
हेही वाचा: Diwali Muhurat Trading 2025 Date and Timing: धनत्रयोदशी आणि दिवाळीला शेअर बाजार राहणार बंद; जाणून घ्या दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग कधी आहे?
ईपीएफओ (EPFO) म्हणजे काय?
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) ही भरातातील पगारदार कर्मचाऱ्यांसाछी तयार करण्यात आलेली एक महत्त्वाची सेवानिवृत्ती बचत योजना आहे. ही योजना कर्माचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी भारत सरकारने सुरू केली आहे. या योजनेचे व्यवस्थापन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना करते, जी कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे.