Wednesday, January 15, 2025 04:50:59 PM

जम्मू काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला

जम्मू, २२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : जम्मू - काश्मीरमध्ये पूँछ जिल्ह्यात सैन्याच्या वाहनांवर हल्ला झाला. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात चार जवान हुतात्मा झाले तर ३ जवान जखमी झाले असून, तीन जवान जखमी झाले ही घटना सुरनकोट भागात घडली. दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू करताच सुरक्षा पथकाने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. अतिरिक्त पथक पाठवून दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे.

राजौरीतील थानामंडी येथील ‘डेरा की गली’ येथे दहशतवादी लपल्याची माहिती गुप्तचरांकडून मिळाली होती. त्यावर दहशतवाद्यांच्या शोधासाठी २० डिसेंबरपासून मोहीम सुरू करण्यात आली. गुरुवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास मोहिमेच्या ठिकाणी ट्रक आणि जिप्सीतून या दोन वाहनांमधून जवान जात होते. त्या वेळी दहशतवाद्यांनी या वाहनांवर गोळीबार केला. याला जवानांनी प्रत्युत्तर दिले. चकमकीत तीन जवान हुतात्मा झाले असून, तीन जखमी झाले आहेत, अशी माहिती लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल सुनील बर्तवाल यांनी दिली. रात्री उशीरापर्यंत ही चकमक सुरू होती.


सम्बन्धित सामग्री