दोघांच लग्न झालेलं अन् दोघांनाही दोन मुलं; संसार सोडून लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या 5 महिन्यांच्या गर्भवती महिलेला संपवलं, प्रियकरानेचं…

विशेष म्हणजे, मृत्यूच्या वेळी कुमकुम पाच महिन्यांची गर्भवती होती. या गंभीर घटनेनंतर आरोपी योगेश घटनास्थळावरून फरार झाला असून, अलवर पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात आहे.

दोघांच लग्न झालेलं अन् दोघांनाही दोन मुलं; संसार सोडून लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या 5 महिन्यांच्या गर्भवती महिलेला संपवलं, प्रियकरानेचं…
Pregnant woman killed

राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. पती आणि मुलांना सोडून प्रियकरासोबत संसार थाटणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणीला अत्यंत निर्घृणपणे संपवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. कुमकुम असे मृत तरुणीचे नाव असून, ती गेल्या दीड वर्षांपासून तिचा प्रियकर योगेश चौधरी याच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. विशेष म्हणजे, मृत्यूच्या वेळी कुमकुम पाच महिन्यांची गर्भवती होती. या गंभीर घटनेनंतर आरोपी योगेश घटनास्थळावरून फरार झाला असून, अलवर पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप आणि शोककळा पसरली आहे.

भाड्याच्या घरात पलंगावर सापडला मृतदेह

अलवरच्या नाहरपूर परिसरातील मेव मोहल्ला भागात ही थरारक घटना घडली. कुमकुम आणि योगेश ज्या भाड्याच्या घरात राहत होते, तिथल्या वरच्या मजल्यावरील खोलीत कुमकुमचा मृतदेह पलंगावर संशयास्पद स्थितीत आढळून आला. बऱ्याच वेळेस घरामधून कोणतीही हालचाल किंवा आवाज न आल्यामुळे शेजाऱ्यांनी तात्काळ घरमालकाला याबद्दल माहिती दिली. घरमालकाने वर जाऊन पाहिले असता, कुमकुमचा निष्प्राण देह पलंगावर पडलेला दिसला आणि तिच्या शेजारीच एक तुटलेला मोबाईल फोनही पडलेला होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. कुमकुमच्या मानेवर आवळल्याच्या आणि मारहाणीच्या खुणा स्पष्टपणे दिसत होत्या. त्यामुळे गुन्ह्यापूर्वी दोघांमध्ये मोठी झटापट झाल्याचा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक तपासानुसार, मृत कुमकुम (वय 28 वर्षे) आणि तिचा प्रियकर योगेश चौधरी (वय 25 वर्षे) हे दोघेही मूळचे उत्तर प्रदेशमधील वृंदावन येथील रहिवासी होते. लग्नाआधीपासूनच ते एकमेकांच्या परिचयाचे होते. धक्कादायक बाब म्हणजे, दोघेही आधीपासूनच विवाहित असून त्यांना प्रत्येकी दोन-दोन मुलेही आहेत. त्यांचे लग्न मथुरा जिल्ह्यात झाले होते, परंतु कुटुंबाला अंधारात ठेवून त्यांनी आपले जुने संसार सोडले आणि ते अलवरला येऊन एकत्र राहू लागले. योगेश अलवरमधील एका खासगी कंपनीत नोकरी करत होता, तर कुमकुम सोशल मीडियावर रील बनवण्याच्या क्षेत्रात सक्रिय होती. दोघे पती-पत्नीसारखेच राहत होते.

हेही वाचा – मिरजेच्या गुंडेवाडीत रक्तरंजित थरार! 30 वर्षीय तरुणावर चाकूहल्ला; घटनेने परिसरात खळबळ

सततच्या वादातून टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय

प्राप्त माहितीनुसार, कुमकुम मृत्यूसमयी पाच महिन्यांची गर्भवती होती, तर तिकडे आरोपी योगेशची पत्नीदेखील गर्भवती असल्याची माहिती समोर आली आहे. कौटुंबिक पार्श्वभूमी आणि जुने संसार सोडून एकत्र आलेल्या या दोघांमध्ये गेल्या काही काळापासून सातत्याने खटके उडत होते आणि त्यांच्यात वारंवार वाद होत असत. याच वादातून योगेशने कुमकुमचा जीव घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात असून, फरारी आरोपी योगेशचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number