देशातील 6 जागांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; राजकीय वर्तुळाचे निकालांकडे लक्ष! कोणाला लागणार विजयाचा गुलाल?

विशेषतः पश्चिम बंगाल आणि आसाममधील निकालांमुळे आगामी राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
CM Joseph Vijay
CM Joseph Vijay

Bypoll Election Results: देशातील ३ राज्ये आणि १ केंद्रशासित प्रदेशातील मिळून ६ महत्त्वाच्या जागांवर पार पडलेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज, शुक्रवारी (9 ऑक्टोबर 2026) रोजी सकाळी 8:00 वाजल्यापासून सुरू झाली आहे. यामध्ये 5 विधानसभा आणि एका लोकसभेच्या जागेचा समावेश आहे. गेल्या मंगळवारी (6 ऑक्टोबर 2026) रोजी या सर्व 6 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे कल समोर येऊ लागले असून राजकीय पक्षांचे भवितव्य स्पष्ट होण्यास सुरुवात झाली आहे.

पश्चिम बंगालमधील नंदीग्राम आणि रेजीनगर मतदारसंघांवर सर्वांचे लक्ष

या संपूर्ण पोटनिवडणुकीत पश्चिम बंगालमधील हायप्रोफाईल नंदीग्राम आणि रेजीनगर या दोन विधानसभा मतदारसंघांकडे सर्वांचे विशेष लक्ष लागले आहे. राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या नंदीग्राम मतदारसंघात भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्राथमिक कलांनुसार नंदीग्राम आणि रेजीनगर दोन्ही जागांवर भारतीय जनता पक्षाचे (BJP) उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र दिसून येत आहे.

हेही वाचा – सारंग लखानी यांच्या कंपनीला 1200 एकर जमीन देण्यावरून पेटला वाद; अंजली दमानियांकडून सुप्रिया सुळेंवर प्रश्नांची सरबत्ती

आसाममध्ये नगाव लोकसभेची एकमेव लढत अन् दक्षिण भारतातील ट्रेंड
आसाममधील ‘नगाव’ ही एकमेव लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे, जिथे भाजपचे देवशीष शर्मा यांनी मोठी आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे दक्षिण भारतात, पुडुचेरीच्या ‘थट्टनचावडी’ विधानसभा जागेवरून एआयएनआरसीचे (AINRC) अशोक आनंद यांनी विजय मिळवला आहे. याशिवाय तामिळनाडूतील राखीव जागा असलेल्या ‘मदुरंतकम’ आणि ‘धारापुरम’ मतदारसंघात टीव्हीके (TVK), अण्णाडीएमके (AIADMK) आणि डीएमके (DMK) यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.

स्थानिक राजकारणावर आणि पक्षांच्या वर्चस्वावर होणारा परिणाम

या 6 जागांवरील निकाल जरी केंद्र किंवा राज्य सरकारांच्या बहुमतावर थेट परिणाम करणार नसले, तरी संबंधित राज्यांमधील राजकीय पक्षांच्या लोकप्रियतेची ही मोठी चाचणी मानली जात आहे. विशेषतः पश्चिम बंगाल आणि आसाममधील निकालांमुळे आगामी राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. थोड्याच वेळात सर्व 6 जागांवरील अंतिम चित्र स्पष्ट होऊन विजयी उमेदवार विजयाचा गुलाल उधळतील.

हेही वाचा – ‘उगाच खोटे आरोप करून निवडणूक लढवू नका’! सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पवार कुटुंबातील संघर्ष चिघळला; जय पवारांचा युगेंद्र पवारांवर थेट निशाणा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version