मोठी बातमी! अभिजीत दीपकेंना दिलासा; न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर, रांका – दासचं काय?

विशेष कार्यकारी न्यायदंडाधिकारी (SEM) न्यायालयाने अभिजीत दीपके यांचा सशर्त जामीन अर्ज मंजूर केला आहे.

मोठी बातमी! अभिजीत दीपकेंना दिलासा; न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर, रांका – दासचं काय?
Abhijeet Dipke bail

CJP या संघटनेचे संस्थापक आणि प्रमुख नेते अभिजीत दीपके यांच्याशी संबंधित कायदेशीर प्रकरणाला आता एक मोठे वळण मिळाले आहे. विशेष कार्यकारी न्यायदंडाधिकारी (SEM) न्यायालयाने अभिजीत दीपके यांचा सशर्त जामीन अर्ज मंजूर केला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यांना ‘पीस बाँड’ म्हणजेच शांतता राखण्याचे वैयक्तिक बंधपत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

न्यायालयाच्या अटी व शर्ती

न्यायालयाने जामीन मंजूर करताना दीपके यांच्यावर काही महत्त्वाच्या अटी लादल्या आहेत. दिपके यांना 50,000 रुपयांच्या जामीन रकमेचा (स्युरिटी बाँड) भरणा करून कायदेशीर प्रक्रियेचे पूर्ण पालन करावे लागणार आहे. या सर्व अटींची पूर्तता झाल्यानंतरच त्यांची कोठडीतून मुक्तता केली जाईल. न्यायालयीन नियमांचे उल्लंघन झाल्यास हा जामीन रद्द होऊ शकतो, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

हेही वाचा –  SIR वादादरम्यान निवडणूक आयोगात मोठा भूकंप! ज्ञानेश कुमार यांनी घेतला मोठा निर्णय; थेट 20 अधिकाऱ्यांच्या…

दिल्ली पोलिसांकडून अधिकृत निवेदनाद्वारे जामिनाची माहिती

या संपूर्ण कायदेशीर घडामोडीबाबत दिल्ली पोलीस प्रशासनाने एक अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करून माहिती दिली आहे. CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांना न्यायालयाने काही ठराविक नियमांच्या अधीन राहून जामीन दिला असल्याचे पोलिसांनी निवेदनात नमूद केले आहे. आवश्यक असणारे ‘पीस बाँड’ आणि 50,000 रुपयांची सुरक्षा रक्कम न्यायालयात जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण होताच त्यांची कायदेशीर सुटका केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number