धक्कादायक! भाजपच्या माजी आमदारावर हिंसक जमावाचा हल्ला; लाठ्या-काठ्या अन् दगडांनी मारहाण करत संपवलं, समोर आलं हे कारण

भीषण मारहाणीच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड तणावाचे वातावरण पसरले आहे.

धक्कादायक! भाजपच्या माजी आमदारावर हिंसक जमावाचा हल्ला; लाठ्या-काठ्या अन् दगडांनी मारहाण करत संपवलं, समोर आलं हे कारण
Crime BJP MLA Killed

Rajasthan former BJP MLA death: राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात एका स्टोन क्रशरवरून झालेल्या वादातून भाजपचे माजी आमदार अतार सिंग भडाना यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भोंडा गावात वर्षभरापासून बंद असलेला स्टोन क्रशर पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नातून भाजप नेते भडाना आणि स्थानिक गावकऱ्यांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले होते. रविवारी रात्री घडलेल्या या हिंसक घटनेत सुमारे 70 ते 80 जणांच्या जमावाने अतार सिंग भडाना यांच्यावर लाठ्या-काठ्या आणि दगडांनी अचानक प्राणघातक हल्ला केला. या भीषण मारहाणीमुळे संपूर्ण परिसरात आणि राजस्थानच्या राजकीय वर्तुळात प्रचंड तणावाचे वातावरण पसरले आहे.

उपचारादरम्यान एसएमएस रुग्णालयात मृत्यू; साथीदारही गंभीर जखमी
भुसावरचे सर्कल ऑफिसर नीरज भारद्वाज यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्राणघातक हल्ल्यात माजी आमदार भडाना यांच्यासह त्यांचे साथीदार गगन शर्मा हे देखील गंभीर जखमी झाले. घटनेनंतर दोघांनाही तातडीने वीर येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने भडाना यांना जयपूरमधील एसएमएस (SMS) रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दुसरीकडे, त्यांचे साथीदार गगन शर्मा यांच्यावर भरतपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा – केंद्राचा मोठा निर्णय! जंतर-मंतरवर आंदोलनाला अधिकृत बंदी; प्रशासनाकडून 3 नवीन पर्यायी ठिकाणं जाहीर

जमिनीवरील अतिक्रमण अन् अवैध खाणकामाचे आरोप; 10 ते 15 दिवसांपासून आंदोलन
स्थानिक गावकऱ्यांनी भडाना यांच्यावर जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवल्याचा आणि अवैध खाणकाम चालवत असल्याचा आरोप केला होता. हा स्टोन क्रशर कोणत्याही परिस्थितीत पुन्हा सुरू होऊ नये यासाठी ग्रामस्थ गेल्या 10 ते 15 दिवसांपासून शांततापूर्ण मार्गाने निदर्शने करत होते. गावकऱ्यांच्या दाव्यानुसार, रविवारी संध्याकाळी भडाना हे सुमारे 40 ते 50 लोकांना सोबत घेऊन आंदोलनस्थळी पोहोचले होते. तिथे जमलेल्या गावकऱ्यांना बळजबरीने हटवण्याचा प्रयत्न केल्याने दोन्ही गटांत हिंसक चकमक उडाली आणि परिस्थिती हाताबाहेर गेली.

गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात; दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोप

या हिंसक घटनेनंतर दोन्ही गटांनी परस्परांवर बेदम मारहाणीचे गंभीर आरोप केले आहेत. घटनेची गंभीर दखल घेत स्थानिक प्रशासनाने गावात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस तुकड्या तैनात केल्या आहेत. पोलिसांनी या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. भाजपच्या ज्येष्ठ नेत्याच्या अशा अचानक झालेल्या हत्येमुळे संपूर्ण राजस्थान हादरले आहे.

हेही वाचा – ‘पुढच्या काळातही काँग्रेसचा सुपडासाफ होणार’; भाजप नेते शिवराज सिंह चौहान यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number