Wednesday, February 18, 2026 05:48:27 PM

Gold Silver Rates Today: सोने-चांदीच्या दरात पुन्हा खळबळ; कालची घसरण आणि आजची मोठी वाढ; पाहा सराफ बाजारात नक्की काय घडतंय?

आंतरराष्ट्रीय बाजारात जोखीम घेण्याची मानसिकता (Risk-on Sentiment) वाढल्याने आणि अमेरिकन डॉलर कमकुवत झाल्याने मौल्यवान धातूंच्या दरांना मिळाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

gold silver rates today सोने-चांदीच्या दरात पुन्हा खळबळ कालची घसरण आणि आजची मोठी वाढ पाहा सराफ बाजारात नक्की काय घडतंय

मुंबई: गेल्या काही दिवसांच्या तीव्र घसरणीनंतर आज सराफा बाजारात (Bullion Market) दिलासादायक सुधारणा पाहायला मिळाली आहे. चांदीचे दर वाढत प्रति किलो सुमारे 2 लाख 67 हजार रुपये, तर सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1 लाख 53 हजार रुपये या पातळीवर पोहोचला आहे, अशी माहिती India Bullions कडून देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात जोखीम घेण्याची मानसिकता (Risk-on Sentiment) वाढल्याने आणि अमेरिकन डॉलर कमकुवत झाल्याने मौल्यवान धातूंच्या दरांना आधार मिळाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

बुधवारी सकाळच्या व्यवहारात (Early Trade) सोने स्थिर राहिले असून, अलीकडील उच्चांकावरून झालेल्या मोठ्या घसरणीनंतर गुंतवणूकदारांनी पुन्हा खरेदीकडे (Bargain Buying) वळणे पसंत केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस सुमारे 4950 डॉलर दरम्यान व्यवहार करत होते. मागील सत्रात सोन्याच्या दरात सहा टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती. तरीही, 29 जानेवारी रोजीच्या ऑल टाइम हायपेक्षा दर सध्या सुमारे 12 टक्के खाली आहेत, मात्र वर्षभरात अद्याप 15 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ नोंदवली गेली आहे.

तज्ज्ञांच्या मते, गेल्या महिन्यात सोने-चांदीच्या दरांमध्ये झालेली प्रचंड उसळी ही आंतरराष्ट्रीय तणाव (Geopolitical Tensions) आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या (Federal Reserve) स्वायत्ततेबाबतच्या चिंतेमुळे होती. मात्र ही तेजी अचानक बदलली आणि चांदीने इतिहासातील सर्वात मोठी एकदिवसीय घसरण अनुभवली, तर सोन्याचा दर 2013 नंतर सर्वाधिक घसरला. Bloomberg च्या अहवालानुसार, अति वेगाने वाढलेले दर ही या घसरणीची मुख्य कारणे होती.

हेही वाचा: Rohit Pawar Tweet: ‘मा. अजितदादांचा अवमान करणारी…’ रोहित पवार संतापले; नेमकं प्रकरण काय?

सोन्याचा आजचा दर  (प्रति 10 ग्रॅम)

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर सुमारे 153540 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये हा दर 153340 रुपये, तर राजधानी दिल्लीत 153280 रुपये नोंदवला गेला आहे. दक्षिण भारतात मात्र सोन्याचे दर तुलनेने जास्त असून, चेन्नईमध्ये 153990 रुपये, हैदराबादमध्ये 153780 रुपये आणि बेंगळुरूमध्ये 153660 रुपये प्रति 10 ग्रॅम दर आहे.

चांदीचा आजचा दर (प्रति किलो)

चांदीच्या दरांमध्येही शहरनिहाय वाढ दिसून येत आहे. मुंबईत चांदीचा भाव 267410 रुपये प्रति किलो, तर दिल्लीत 266950 रुपये आहे. चेन्नईमध्ये चांदी सर्वाधिक महाग असून, दर 268190 रुपये प्रति किलो नोंदवला गेला आहे. हैदराबादमध्ये 267830 रुपये, बेंगळुरूमध्ये 267620 रुपये, तर कोलकातामध्ये 267050 रुपये प्रति किलो दर आहे.

एकूणच, गेल्या काही दिवसांच्या तीव्र घसरणीनंतर सोने-चांदीच्या दरात स्थैर्य आणि सुधारणा दिसून येत आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते बाजारातील अस्थिरता (Volatility) अद्याप कायम असून, गुंतवणूकदारांनी अल्पकालीन चढ-उतार लक्षात घेऊनच निर्णय घ्यावेत, असा सल्ला दिला जात आहे.

हेही वाचा: Sharad Pawar: 'सुनेत्रा पवारांना संधी मिळाली याचा...'; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया


सम्बन्धित सामग्री