Saturday, March 07, 2026 04:57:24 AM

Mahashivratri Utsav 2026 : शिवभक्तीत रमली सारी सृष्टी; अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला सद्गुरूंच्या आश्रमात महादेवाचा उत्सव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने ईशा योग केंद्रात आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली.

mahashivratri utsav 2026  शिवभक्तीत रमली सारी सृष्टी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला सद्गुरूंच्या आश्रमात महादेवाचा उत्सव

कोईम्बतूर : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईशा फाउंडेशनचे संस्थापक पद्मविभूषण सदगुरु यांच्यासह महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने ईशा योग केंद्रात आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. महाशिवरात्री उत्सवादरम्यान ईशा फाऊंडेशनचे संस्थापक पद्मविभूषण सदगुरू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत व सत्कार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईशा योग केंद्र कोइम्बतूर, तामिळनाडूद्वारे आयोजित महाशिवरात्री उत्सवात दिव्य प्रकाश, भक्तिभाव आणि शिवसाधनेच्या पार्श्वभूमीवर सादर झालेल्या भव्य सादरीकरणाचा अनुभव घेतला. 

हेही वाचा : Youngest Organ Donor: दुःखाच्या महासागरात मानवतेचा दीप; केरळच्या सर्वात लहान अवयवदात्याची ही कथा वाचून डोळे पाणावतील

"मला येथे जी दैवी अनुभूती येत आहे, यावरून हे स्पष्ट होते की, हे ठिकाण देवाधिदेव महादेवाच्या आशीर्वादाने पुनीत झाले आहे," असे मत यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. कोईम्बतूर येथील ईशा योग केंद्रात आयोजित महाशिवरात्री उत्सवात ते बोलत होते. राजनाथ सिंह यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय नेते आणि सेलिब्रिटी उपस्थित होते. तसेच क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती, उद्योग क्षेत्रातील नेते, अभिनेते, गायक आणि कलाकार उपस्थित होते. महाशिवरात्री हा ईशाचा दरवर्षी आदियोगींच्या उपस्थितीत होणारा सर्वात भव्य वार्षिक उत्सव आहे. 

कार्यक्रमात मान्यवरांचे आणि प्रेक्षकांचे स्वागत करताना, सद्गुरूंनी आदियोगींच्या प्रासंगिकतेबद्दल आणि समकालीन काळात अनुरूप असलेल्या त्यांच्या संदेशाबद्दल सांगितले की, "आदियोगी हे भूतकाळातील नाहीत. तर आदियोगी भविष्यातील आहेत. कारण त्यांनी जे प्रदान केले आहे ते विश्वासप्रणाली, तत्वज्ञान, विचारधारा किंवा शिकवणी नाही, तर ते कल्याणासाठीचे तंत्रज्ञान आहेत." ते पुणे म्हणाले की, पुढील एक-दोन दशकांत, आम्ही कल्याणाच्या तंत्रज्ञानाला (जागतिक स्तरावर) एक महत्वाची शक्ती बनताना पाहू इच्छितो. वर पाहणे नाही. तर आत पाहणे हाच एकमेव मार्ग आहे." 

"गंगा" या संकल्पनेवर आधारित या वर्षीच्या महाशिवरात्रीत पवित्र नदीचे आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय पैलू अधोरेखित करण्यात आले होते. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शक्तिशाली ध्यान, उत्साही संगीत आणि नृत्य सादरीकरणे आणि भारताच्या नामांकित कलाकारांचे कलाविष्कार यावेळी सादर करण्यात आले. या भव्य कार्यक्रमासाठी ईशा योग केंद्रात भाविकांच्या गर्दीचा ओघ सुरूच आहे. 70 हून अधिक देशांतील लाखो भाविकांसह 4 हजाराहून अधिक स्वयंसेवक या उत्सवात सहभागी झाले. ईशाची महाशिवरात्री जगभरातील 25 भाषांमध्ये प्रसारित झाली असून 200 हून अधिक दूरदर्शन वाहिन्या आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले आहे.


सम्बन्धित सामग्री