बीडच्या नांदूर हवेली गावात चुलीवरील गरम दूध अंगावर पडून 3 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीये. दुर्गा असं त्या मुलीचं नाव आहे. दुर्गा आपल्या घराच्या समोर खेळत असताना एक कुत्रा भुंकून तिच्या दिशेने येत होता यामुळे ती घाबरली आणि घरात पळाली.
अंगणात चुलीवर तापत ठेवलेले दुधाच्या पातेल्याला ती जाऊन धडकून पडल्याने गरम दुधाने भरलेले पातेले तिच्या अंगावर पडल्याने ती गंभीररित्या भाजली. उपचारासाठी तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिची प्रकृती गंभीर झाली.
त्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात देण्यात आले मात्र तिथे उपचार होऊ शकले नाहीत अखेर तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नांदूर हवेली गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.