मोठी बातमी! देशभरातून दिल्लीत येणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द; CJP आंदोलनाचे ‘साईड इफेक्ट’?

CJP ने उद्या म्हणजेच 10 ऑक्टोबर रोजी जंतरमंतर येथे आंदोलनाची हाक दिली आहे. दरम्यान नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन येथे जाणाऱ्या अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.
Delhi Railway Cancellation
Delhi Railway Cancellation

नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन येथे जाणाऱ्या अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. CJP ने उद्या म्हणजेच 10 ऑक्टोबर रोजी जंतरमंतर येथे आंदोलनाची हाक दिली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन घेण्यात येत आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने रेल्वे रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.

यावेळी आज दुपारी 2 वाजेपासून सुटणाऱ्या आणि उद्या 10 ऑक्टोबर रोजी पहाटे ते दुपारी चार वाजेपर्यंत पोहोचणाऱ्या सर्व मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. संपूर्ण देशभरातून दिल्लीत येणाऱ्या रेल्वे गाड्या या कालावधीत रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे गाड्या रद्द केल्यानं प्रवाशांना विनंती असून त्यांनी प्रवासाचं नियोजन करावं, असे रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version