हातपाय धुण्यासाठी गेले अन् परतलेच नाहीत; अमरावतीच्या शेतकऱ्यासोबत….; अख्खं गाव अजूनही धसक्यात

Amravati News : अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे अप्पर वर्धा धरणाच्या मुख्य कालव्यात शेतकरी वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने बचावकार्यात अडथळे येत असून, प्रशासनाकडून शोधमोहीम सुरू आहे.
महाराष्ट्र बातम्या
Maharashtra News

अमरावती : अमरावती जिल्ह्यातून एक दुर्दैवी घटना समोर आलेली आहे. तिवसा शहरात अप्पर वर्धा धरणाच्या मुख्य कालव्यात एक शेतकरी वाहून गेला असून त्याचा शोध अजूनही लागलेला नाही. पिंटू उर्फ दिवाकर माहोरे (वय 52) असे वाहून गेलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

पाण्याच्या जोरदार प्रवाहात शेतकरी बेपत्ता
मिळालेल्या माहितीनुसार, रब्बी हंगामासाठी कालव्यात पाणी सोडण्यात आलेले होते. काल दुपारच्या सुमारास ते कालव्यात हातपाथ धुण्यासाठी उतरले. त्याचवेळी त्यांचा पाय घसरला आणि ते पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले. घटना घडताच स्थानिकांनी आरडाओरड केली, मात्र पाण्याचा वेग जास्त असल्याने त्यांना वाचवता आले नाही.

हेही वाचा- जमीन व्यवहार फसला, ट्रेडिंगमध्ये पैसे बुडाले अन्…; माजी प्राध्यापकाच्या हत्येचं गूढ 24 तासांत उलगडलं, आमगावात नेमकं काय घडलं?

याची माहिती तातडीने प्रशासनाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. कालपासून शोध आणि बचाव मोहीम ही युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र, अजूनपर्यंत ही माहोरे यांचा मृतदेह हाती लागलेला नाही. या कालव्यात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने बचाव कार्यात अडथळे येत आहेत. सध्या प्रशासनाकडून कालव्याच्या काठावर शोध मोहीम राबवली जात आहे. रब्बीसाठी सोडलेल्या पाण्यामुळे एका शेतकऱ्याचाच जीव धोक्यात आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version