सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! DA वाढीचा निर्णय जाहीर, पगारात किती होणार वाढ?

DA Hike Update : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महागाई भत्त्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारासोबतच थकबाकीच्या रकमेकडेही लक्ष लागलं आहे. नेमका कोणाला फायदा होणार? जाणून घ्या सविस्तर.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! DA वाढीचा निर्णय जाहीर, पगारात किती होणार वाढ?
DA Hike Update

सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी दिवाळीनंतर मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी थेट महागाई भत्त्यात थेट 5 टक्के वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील 2 लाख 75 कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना थेट लाभ होणार आहे. पण या वाढीमध्ये चालू वर्षातील 4 टक्के आणि गेल्या वर्षी थकीत असलेल्या 1 टक्का डीएच समाविष्ट आहे.

महागाई भत्ता वाढीमुळे पगाराचं गणित बदलणार
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डीए वाढीसंदर्भामधील अधिकृत आदेश हे शुक्रवारी जारी केले जातील. याच वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या महिन्याच्या पगारात वाढ होणार असून पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्येही वाढ होणार आहे.

हेही वाचा – ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नवा नियम; किती टक्के गुण मिळवावे लागणार?

पैसे कधी जमा होणार?
चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना आता अतिरिक्त लाभ सरकारने चतु्र्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी विशेष घोषणा केलेली आहे. डीएच वाढीसह त्यांना दहा हजार रुपयांचा अतिरिक्त एरियल ही दिला जाणार आहे. ही रक्कम 1 नोव्हेंबर रोजी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा ही होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेले आहे. महागाईच्या काळात सरकारने घेतलेला हा महत्त्तवाचा निर्मय कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक मानला जात आहे.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान | Maharashtra Election

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number