पुणे, १६ मे २०२४, प्रतिनिधी : पुणे शहरात उन्हाचा तडाखा वाढला आहे. बालकांना सकाळी १० ते १२ या वेळेत अंगणवाडीत यावेच लागते. त्यामुळे वाढत्या उन्हाचा फटका बालकांना बसू नये, यासाठी एकात्मिक बालविकास विभागाने अंगणवाड्यांच्या वेळा बदलल्या आहेत. अंगणवाडीचे कामकाज सकाळी ८ ते १२ यावेळेत असेल. परिणामी, बालकांना पोषण आहार देण्याची वेळ आता सकाळी आठ ते सकाळी साडेदहा अशी करण्यात आली आहे. उन्हामुळे चिमुकल्यांना उन्हाचा त्रास होत असल्याने एकात्मिक बालविकास विभागाने घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.