महाराष्ट्रात यंदा थंडीचा मुक्काम कमी होणार? एल निनोचा हवामानावर परिणाम, तज्ज्ञांचा मोठा अंदाज

राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. यावेळी एल निनोमुळे पावसाचा तुटवडा जाणवला, यंदा सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस बरसला. तर आता एल निनोमुळे थंडीचा कालावधी देखील कमी होणार आहे.

महाराष्ट्रात यंदा थंडीचा मुक्काम कमी होणार? एल निनोचा हवामानावर परिणाम, तज्ज्ञांचा मोठा अंदाज
Weather Update

राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. यावेळी एल निनोमुळे पावसाचा तुटवडा जाणवला, यंदा सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस बरसला. तर आता एल निनोमुळे थंडीचा कालावधी देखील कमी होणार आहे. आधीच ऑक्टोबर हिटमध्ये आग ओकतोय त्यामुळे नागरिक चांगलेच होरपळून निघत आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये लोक थंडीची वाट पाहत आहेत. अशातच हवामानात मोठे बदल जाणवत आहेत.

हेही वाचा- पावसाची पुन्हा एन्ट्री! 23 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील कोणत्या जिल्ह्यांत बरसणार सरी?

एकीकडे राज्यात उष्ण वातावरण जास्त राहणार असताना दुसरीकडे दक्षिणेत अति मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात तळकोकण आणि घाटमाथ्याचा काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रात हवामान निरभ्र राहणार आहे. यावेळी नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, सांगली आणि सोलापूर येथे हलक्या पावसाची शक्यता आहे. तर परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, जालना आणि धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे हवामान विभागाने राज्यातील 11 ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. मात्र, कोणत्याही भागासाठी अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. त्याचसोबत कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये 21 ऑक्टोबर रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी बदलत्या हवामानानुसार आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number