महामार्गावर भीषण अपघात! भाजपच्या माजी खासदाराच्या ताफ्यातील कार दुभाजकाला धडकली; एकाचा दुर्दैवी मृत्यू

आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर एका कारची धडक दुभाजकाला (डिवायडर) बसल्याने 50 वर्षीय सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला.
Accident on lucknow agra expressway
Accident on lucknow agra expressway

कन्नौज : आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर एका कारची धडक दुभाजकाला (डिवायडर) बसल्याने कन्नौजचे माजी खासदार सुब्रत पाठक यांच्या 50 वर्षीय सुरक्षा रक्षकाचा (गनर) मंगळवारी मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात कारमधील अन्य दोघे जण जखमी झाले आहेत. त्याच कारमधून आग्र्याहून कन्नौजला जात असलेले सुब्रत पाठक मात्र या अपघातात सुदैवाने बचावले. ही घटना दुपारी 2 च्या सुमारास सकरावा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिकंदरपूर गावाजवळ ‘कट क्रमांक 145’ वर घडली. पाठक यांच्या ताफ्यातील त्यांची स्वतःची ‘महिंद्रा स्कॉर्पिओ’ गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला जाऊन धडकली. या अपघातात कॉन्स्टेबल अभिषेक त्रिपाठी यांचा जागीच मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. सक्रावा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भागमल सिंह यांनी सांगितले की, 50 आणि 32 वर्षे वयाचे कॉन्स्टेबल कुंवर पाल आणि शरद प्रकाश यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. पाठक यांनी पोलिसांना सांगितले की, शरद कार चालवत होता. त्रिपाठी पुढच्या सीटवर (सह-चालकाच्या बाजूला) बसले होते आणि कुंवर पाल मागच्या सीटवर होते. पोलीस अधीक्षक विनोद कुमार यांनी सांगितले की, त्रिपाठी यांच्या मृत्यूबाबत त्यांच्या कुटुंबीयांना कळवण्यात आले आहे.

हेही वाचा : इलेक्ट्रिक कार डिव्हायडरला धडकली, क्षणार्धात उडाला आगीचा भडका; एकाच कुटुंबातील 4 जणांचा होरपळून मृत्यू

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version